पिंपरी, ता. ९ ः लोणी काळभोर येथील शालेय विभागीय मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, नऊ रौप्य आणि पाच कांस्य पदकांची कमाई केली. अकोला येथील १९ ते २२ डिसेंबरला होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रथमेश सोनवणे आणि अमनप्रीतसिंग उब्बी यांची निवड झाली आहे.
सर्व पदक विजेते खेळाडू पिंपरीतील अजमेरा-टेल्को मैदानावर प्रशिक्षक बळवंत सुर्वे आणि सुकन्या सुर्वे यांच्याकडे सराव करतात. पदक विजेत्यांची नावे (कंसात वजन गट दिला आहे) पुढील प्रमाणे -
१४ वर्षे मुले ः सुवर्ण - प्रथमेश सोनवणे (३० ते ३२ किलो), रौप्य - आर्यन वर्मा (२८ ते ३० किलो), प्रणव पाटील (३६ ते ३८ किलो), विनायक मोरे (४६ ते ४८ किलो), अर्णव गायकवाड (४८ ते ५० किलो); १७ वर्षे ः सुवर्ण - अमनप्रीतसिंग उब्बी (५४ ते ५७ किलो), रौप्य - श्रवण गुडेकर (५२ ते ५४ किलो), कांस्य - आर्यन सरतापे (४४ ते ४६ किलो), आयुष गायकवाड (५० ते ५२ किलो), समर्थ कांबळे (६६ ते ७० किलो); १९ वर्षे ः रौप्य - सोमनाथ कांबळे (४४ ते ४६ किलो), प्रेम कलांगे (४९ ते ५२ किलो), पार्थ अग्रवाल (५६ ते ६० किलो), संयम सखुजा (६४ ते ६९ किलो).
PNE24U61226