This year honor of the government Mahapuja in Kartik Ashadhi Yatra Pune Divisional Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar rrp
Marathi November 13, 2024 07:24 AM


दरवर्षी कार्तिक यात्रेतील शासकीय महापूजेचा मान राज्यातील उपमुख्यमंत्र्यांना मिळतो. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री शासकीय महापूजेत सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे हा मान आता पुण्यातील विभागीय आयुक्तांना देण्यात आला आहे.

सोलापूर : दरवर्षी कार्तिक यात्रेतील शासकीय महापूजेचा मान राज्यातील उपमुख्यमंत्र्यांना मिळतो. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री शासकीय महापूजेत सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे हा मान आता पुण्यातील विभागीय आयुक्तांना देण्यात आला आहे. (This year honor of the government Mahapuja in Kartik Ashadhi Yatra Pune Divisional Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar)

यंदा कार्तिक शुद्ध एकादशी उद्या म्हणजेच 12 नोव्हेंबर 2024 रोजी आली आहे. दरवर्षी कार्तिक यात्रेतील शासकीय महापूजेचा मान राज्यातील उपमुख्यमंत्र्यांना मिळतो. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू असल्याने महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे शासकीय महापूजेत सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे महापूजेचा मान पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना मिळाला असल्याची माहिती मंदिर समितीने दिली. तसेच डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासोबत मानाचे वारकरी उपस्थित राहणार आहेत.

– Advertisement –

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : गाव एक पण मतदारसंघ दोन, उमेदवारांचाच होतोय घोळ; नेमकं प्रकरण काय?

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पंढरपुरात भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. पालख्यांचे आगमन झाले असून 65 एकर परिसरात वारकरी मोठया संख्येने दिसत आहेत. तसेच विठ्ठलाची दर्शनरांग पत्राशेडपर्यंत गेली आहे. यंदा कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दोन लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाल्याची माहिती पेालिसांनी दिली आहे. तसेच कार्तिक वारीत पोलीस प्रशासनाकडून वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी 1 हजार 626 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

– Advertisement –

पोलीस मदत केंद्रे आणि जड वाहतुकीवर बंदी

दरम्यान, कार्तिकी वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे. याशिवाय वाहतुक नियमनासाठी 13 ठिकाणी डायव्हरशन पॉईट सुरू करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट आणि अंबाबाई पटांगण येथे तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : निवडणुकीच्या पार्टीने केला घात; काँग्रेस कार्यकर्त्याचा विहिरीत बुडून मृत्यू


Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.