Viral: लग्न म्हटलं की कुटुंबात उत्साहाचं वातावरण असतं. लग्नात अनेक प्रकारची हौस-मौज केली जाते. यामध्ये आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे लग्नाची पत्रिका.. आजकाल आपण पाहतो, विविध प्रकारच्या लग्नपत्रिका असतात, ज्या व्हायरल होतात. अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होतेय. पण ही लग्नपत्रिका साधीसुधी नाही, तर एका मुस्लिम कुटुंबियांची ही पत्रिका आहे, आणि ज्यावर चक्क हिंदू देवी-देवतांचे फोटो आहेत. नेमकं काय खास आहे या लग्नपत्रिकेत? जाणून घ्या..
अनेकदा असे दिसून येते की, कोणत्याही शुभ कार्यात हिंदू कुटुंबातील लोक प्रथम गणेशाची पूजा करतात. त्याचप्रमाणे व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेवरही गणपतीचा फोटो आहे. व्हायरल होत असलेल्या मुस्लिम कुटुंबाच्या लग्नाच्या कार्डावरही गणपतीचा फोटो छापण्यात आला आहे. मुस्लीम कुटुंबाच्या लग्नपत्रिकेवर गणपती आणि हिंदू देवी-देवतांचे फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ही लग्नपत्रिका जवळपास सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहे. सायमा बानो आणि इरफानचे लग्न 8 नोव्हेंबरला होते. लग्नाआधीही हे कार्ड खूप व्हायरल झाले होते आणि आता त्याची खूप चर्चा होत आहे. या लग्नपत्रिकेवर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.
उत्तर प्रदेशातील अमेठी येथील एका मुस्लिम कुटुंबाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नपत्रिका पाहिल्यानंतर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत तर काही जण याचे कौतुक करत आहेत. तर ही लग्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतर नेटकरी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.
काश की सभी मुस्लिम इतने अच्छे होते?
— Chandan Sharma (@ChandanSharmaG) November 5, 2024
ऐसे मुसलमानों के लिए मेरे दिल में हमेशा से इज्जत रहा है और आगे भी रहेगा
यह मोहम्मद सब्बीर हैं
उत्तर प्रदेश के अमेठी के रहने वालें हैं
इन्होंने अपनी बेटी सायमा बानो के शादी कार्ड में प्रभु श्री कृष्ण और प्रथम पूज्य गणेश जी का तस्वीर छपवाकर एक… pic.twitter.com/VUECicCJGj
एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, उत्तर प्रदेशातील अमेठी हे एकतेचे उदाहरण आहे. मुस्लिम कुटुंबाला मुलीच्या लग्नाची पत्रिका अगदी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे छापून मिळाली. लग्नाच्या पत्रिकेवर भगवान गणेश आणि राधा-कृष्णाचे चित्र पाहायला मिळाले. तसेच यावर एक संदेशही लिहिण्यात आला आहे, तो म्हणजे ''सभी वर्गों से प्यार,सभी सच्चे भारत वासी हैं।'' असा राष्ट्रीय एकात्मता दाखवणारा संदेश आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, अशा लोकांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. यामुळे माझे हृदय भरून आले आहे.
एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, जर कोणी चांगले काम करत असेल तर त्याचे कौतुक करणे ही आपली जबाबदारी आहे. दुस-याने लिहिले की, हिंदूंनीही असेच काम केले पाहिजे जेणेकरून दोन धर्मांमध्ये सलोखा राखता येईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )