मासिक पाळीमध्ये ऐच्छिक रजा,सर्व्हायकल कॅन्सरची मोफत लस; मविआच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी काय काय?
अपूर्वा जाधव November 10, 2024 04:13 PM

Mahavikas Aghadi Manifesto :  विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यामध्ये महिलांसाठीच्या विशेष तरतुदींच्या आश्वासनाने विशेष लक्ष वेधून घेतलंय. मासिक पाळीत ऐच्छिक रजा ते सर्व्हायकल कॅन्सरची मोफत लस यांसह दहा आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने महिलांना दिलेल्या आश्वासनांचा विधानसभा निवडणुकांमध्ये काय परिणाम हे पाहणं गरजेचं ठरेल. 

महायुतीच्या सरकारने आणलेल्या लाडकी बहिण योजनेमुळे निवडणुकांमध्ये काय परिणाम होणार हा प्रश्न सातत्याने पटलावर येतोय. त्यातच भाजपच्या जाहीरनाम्यात याच लाडकी बहिण योजनेचे पैसे हे 1500 वरुन 2100 करण्यात आलेत. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी काही विशेष आणि महत्त्वाच्या सवलतींचा उल्लेख आहे. त्यामुळे महिला आता कोणत्या आश्वासनांवर विश्वास दाखवणार हे येत्या 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.   

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी काय काय? 

  1. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह 3 हजार रुपये देणार
  2. महिलांना बस प्रवास मोफत करणार 
  3. स्वयंपाकाचे हा गॅस सिलेंडर प्रत्येकी पाचशे रुपयांत उपलब्ध करुन देणार 
  4. महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी निर्भय महाराष्ट्र धोरण आखणार 
  5. त्याचप्रमाणे शक्ती कायद्याची देखील अंमलबजावणी करणार
  6. 9 ते 16 वयोगटातील सर्व मुलींना गर्भमुख कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) प्रतिबंधक लस मोफत देणार 
  7. महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांत दोन दिवस ऐच्छिक रजा देणार 
  8. बचत गट सक्षमीकरणसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार
  9. स्वतंत्र बाल कल्याण मंत्रालय स्थापन करणार 
  10. जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नाव ठरावीक रक्कम बँकेत ठेवून तिने अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर तिला एक लाख रुपये देणार 

मल्लिकार्जुन खरगे यांनी काय म्हटलं?

यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने आणि देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच गौरव पुन्हा स्थापित करण्यासाठी हा महाराष्ट्रनामा आहे. पाच गॅरंटी आधी जाहीर केलेल्या आहेत. सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वातआधी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची आहे. आताच्या सरकारला सत्तेतून हटवलं तर आम्हाला चांगलं सरकार देता येईल, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. 

ही बातमी वाचा : 

मी काय म्हातारा झालोय का? सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही, शरद पवारांची जोरदार बॅटिंग

Mahavikas Aghadi Manifesto: प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये, मासिक पाळीच्या 2 दिवस रजा; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठी घोषणा

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.