Maha Vikas Aghadi Manifesto : भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आज (10 नोव्हेंबर) महाविकास आघाडीकडून सुद्धा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीने आमचा हा महाराष्ट्रनामा असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीची सत्ता येताच पहिल्या 100 दिवसांत काय करणार? याबाबत उहापोह करण्यात आला आहे. यामध्ये महिला, शेतकरी, युवक व शिक्षण, आरोग्य, उद्योग-व्यवसाय, जनतेच्या हितासाठी, शहर विकास, सुशासन, महाराष्ट्राचा स्वाभिमान अशा अंगाने काय काय करण्यात येईल याबाबत सांगण्यात आलं आहे.
* राज्यातील सर्व सरकारी व खासगी शाळा-महाविद्यालयांतील रखडलेली शिक्षक भरती प्राधान्याने सुरू करणार
* शिक्षण हक्क कायद्यातील बालकांच्या मोफत शिक्षणाची मर्यादा वाढविणार
* शाळा, महाविद्यालये, प्रायव्हेट कोचिंग क्लासेसची फी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार
* सरकारी शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षणावरील सध्याची तरतूद वाढविणार
* राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम्सची व्यवस्था करणार
* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्स, सायकल आणि वाहनसेवा मोफत देणार
* जिल्हा परिषद शाळा बंदीचा निर्णय रद्द करणार, पटसंख्येअभावी शाळा बंद करणार नाही, तसेच आरटीईच्या कक्षेबाहेर एकही शाळा न राहण्याची दक्षता घेणार
* जन्मानंतरच्या पहिल्या सहा वर्षांत मुलांचा बौद्धिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास सर्वाधिक वेगाने होती. या दृष्टीने पालकांचे प्रबोधन व मुलांच्या शिक्षणासाठीचे धोरण आखणार
* प्रत्येक जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार
* उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देणार
* ओबीसींना १० वीनंतर मिळणारी शिष्यवृत्ती तातडीने मिळण्याची व्यवस्था करणार शिष्यवृत्ती वेळेत न मिळाल्यास तक्रार मांडण्याची व्यवस्था निर्माण करून त्याचे २१ दिवसांत निवारण करणार
* १० वीनंतरच्या शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात ३ वसतिगृहे निर्माण करणार
* राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीची संख्या वाढविणार शिष्यवृत्तीसाठीच्या अटी कमी करणार
'बार्टी', 'महाज्योती' आणि 'सारथी मार्फत देण्यात येणारा शिष्यवृत्तीचा निधी वाढविणार
* बेरोजगारीचे उग्र स्वरूप पाहता दहावी-बारावी अनुत्तीणांसाठी आयटीआय दोन शिफ्टमध्ये चालविणार
* रोजगारक्षमता आणि कौशल्य निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि आयआयटी, मुंबई या संस्था संयुक्तपणे काम करणार
* 'यूपीएससी प्रमाणेच 'एमपीएससी'चे वेळापत्रक निश्चित करणार, परीक्षांचा निकाल ४५ दिवसांत लावणार प्रवेश परीक्षा फी माफ करणार
* स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ३ ग्रंथालये आणि प्रत्येक तालुक्यात एक अशाप्रकारे ३५८ वातानुकूलित अभ्यासिकांची निर्मिती करणार
* रॅगिंग प्रतिबंधक कायद्याचे पुनर्विलोकन करणार, २०१२ मध्ये स्वीकारलेल्या छेडछाडमुक्त महाराष्ट्र धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करणार
* कोकणात 'फिशिंग अँड मरीन सायन्स विद्यापीठ स्थापन करणार
* पुण्यात नियोजन व वास्तुविशारद प्रशिक्षण महाविद्यालयाची (कॉलेज ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर) स्थापना करणार
* कुशल अध्यापक निर्मितीसाठी 'अध्यापक प्रशिक्षण विद्यापीठ विकसित करणार
* महाराष्ट्राच्या जनतेला निरोगी, निरामय आरोग्य लाभावे, मानसिक आरोग्य सुदृढ असावे यासाठी 'निरामय महाराष्ट्र' अभियान राबविणार. याअंतर्गत योगसाधना, निरनिराळे व्यायामप्रकार, आहार नियोजन, नियमित तपासण्या यासंदर्भात सार्वजनिक-स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींकडून आयोजित उपक्रमांना प्रोत्साहन देणार
* सर्वांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी आरोग्य सेवा हक्क धोरण अंगीकारणार, आरोग्य मानकांनुसार विविध स्तरांवर आरोग्य सेवांचा दर्जा सुधारणार
* प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय सुसज्ज करणार, सर्व शहरांत मोहल्ला क्लिनिक्स विकसितकरणार
* प्रत्येक तालुक्यात शंभर बेड्सचे अत्याधुनिक रुग्णालय उभारणार
* आरोग्य सेवा अधिक उत्तरदायी आणि पारदर्शक बनविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था यांना सामावून, आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख आणि नियोजन प्रक्रिया राबविणार, लोक सहभागाने जन आरोग्य समित्या सक्रिय करणार
* भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांवर नेमलेल्या बापट व रेणके आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करून योग्य शिफारशी अमलात आणणार
* मागास, उपेक्षित आणि आदिवासी जातसमूहांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करून त्याचा पूर्ण वापर करणार. त्यांच्यासाठीच्या शंभर टक्के निधीचा विनियोग करणार, त्यांचे हक्काचे बजेट सुरक्षित ठेवण्यासाठी कायदा करणार.
* आदिवासी समाजासाठी विशेष आरोग्यसेवा पुरविणार व पोषण मिशन राबविणार
* अल्पसंख्याकांच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी 'सारथी च्या धर्तीवर रफिक इझकेरिया यांच्या नावे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करणार
* तांडा विकास महामंडळ स्थापन करणार
* खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असणारी 'महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (अमृत) आणि 'आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था' (TRTI) या दोन्ही संस्थांच्या निधीत भरीव वाढ करणार
* सर्व विकास महामंडळांच्या वतीने देण्यात येणाऱ्या व्यवसाय कर्जाची मर्यादा वाढविणार
* बंजारा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी 10लाख रुपये विनाव्याज कर्ज 'वसंतराव नाईक महामंडळा 'तर्फे उपलब्ध करून देणार
* भटक्या-विमुक्तांचे उच्च शिक्षण व परदेशी शिक्षणासाठी विशेष निधी देणार
* आर्थिक दुर्बल विद्यार्थी व शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी, तांत्रिक कौशल्य निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार
* मदरसा विकास आणि आधुनिकीकरणाच्या दृष्टीने इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांचा समावेश करणार
* 'रमाई आवास योजने' अंतर्गत घरे दिलेल्यांची घरपट्टी मर्यादित ठेवण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणांना देणार
* 'रमाई आवास योजने'तील 20 वर्षे पूर्ण झालेल्या घरकुलांच्या डागडुजीसाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार
* शहरी गरिबांसाठी महानगरपालिका हद्दीत शेल्टर उभारणार
* हाताने मैला साफ प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करतानाच हे काम कोणत्याही समाजाला हाताने करावे लागणार नाही, याची दक्षता घेणार, या कामाचे यांत्रिकीकरण करून त्यासाठी सध्या कार्यरत असणाऱ्या कामगारांनाच प्राधान्य देणार
इतर महत्वाच्या बातम्या