युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन जत मतदारसंघात पाठिंबा देत असल्याचे केलं जाहीर.
महाविकास आघाडीच्या जाहीरनामांमध्ये भविष्यातील 5 महत्त्वाचे मुद्देनिरोगी महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, सर्व समावेश महाराष्ट्र आणि सशक्त नागरी महाराष्ट्र या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्थान देण्यात आलेले आहे. तर पहिल्या 100 दिवसात करण्यात येणाऱ्या योजनांचा आणि उपाय योजनांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे..
महालक्ष्मी अंतर्गत महिलांना प्रतिमा 3000 रुपये देणार,
महिलांना बस प्रवास मोफत करणार,
स्वयंपाकाचे 6 गॅस सिलेंडर प्रत्येकी 500 रुपये उपलब्ध करणार,
महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेणार
महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, युवक शिक्षण,आरोग्य, उद्योग, व्यवसाय, सामाजिक न्याय, जनतेच्या हितासाठी, शहर विकास, सुशासन, महाराष्ट्राचा स्वाभिमान या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेला आहे
Maharashtra News Live Updates: भाजप उमेदवार संतोष दानवे यांनी मनोज जरांगे यांची घेतली भेटरावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनी रात्री एक वाजता मनोज जरांगे यांची भेट घेतली, अंतरवली मध्ये जाऊन संतोष दानवे यांनी मनोज जरांगे यांचा सत्कार देखील केलाय. संतोष दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार असून रात्री उशिरा अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली..चर्चेचा तपशील मात्र कळू शकला नाही.
Maharashtra Marathi News Live Updates : श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्काश्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का
सुनील तटकरे यांचे निकटवर्ती श्याम भोकरे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्कात
रायगड जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते श्याम भाऊ भोकरे यांनी दिला पदाचा राजीनामा
14 नोव्हेंबरला पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती
श्रीवर्धन तालुक्यातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून श्याम भोकरे यांनी अजित पवार गटाचा दिला राजीनामा
Manoj Jarnage : मनोज जरांगेंचादहा दिवसांत १७ जिल्ह्यांचा दौरामनोज जरांगे पाटील हे 17 जिल्ह्याचा दौरा येत्या दहा दिवसात करणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये गावागावांमध्ये बैठका घेतील, चर्चा करतील. या दौऱ्यात केवळ आरक्षणाच्या आंदोलनाची तयारी करणार आहे असं मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. मात्र गावागावातला जिल्हा जिल्ह्यातला त्यांच्या भेटी ही आता कुणाला पाडणार याची चर्चा सुरू झालीय.
Amit Shah Live : अमित शाह यांचा ठाकरेंना सवालसावरकरांवर राहुल गांधी चांगले बोलतील का? अमित शाह यांचा ठाकरेंना सवाल
Akola News : जय मालोकर याचा मोठा भावाला जिवे मारण्याची धमकीराष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी आणि मनसेच्या राड्यानंतर मृत्यू झालेल्या मनसे सैनिक जय मालोकर याचा मोठा भावाला जिवे मारण्याची धमकी आलीये.. विजय मालोकार काल मध्यरात्रीनंतर 3 ते 4 लोकांकडून जिवे ठार मारण्याची धमकी मिळाली.. विजय मालोकार हा अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहे.. विजयने आपला निवडणूक प्रचार थांबावा, अन्यथा ठार मारू, अशी धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्यांनी विजय मालोकार यांच्या नातेवाईकाला मारहाण केलीए.. यासंदर्भात त्यांनी सिव्हिल लाईन पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौकशी सुरू केली.
Maharashtra Marathi News Live Updates : शिंदेंच्या विजय शिवतारेंच्या विरोधात अजित पवारांची आज सभाएकनाथ शिंदे यांच्या विजय शिवतारेंच्या विरोधात अजित पवारांची आज सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजी झेंडे यांच्या प्रचारार्थ अजित पवार पुरंदरमध्ये सभा घेणार आहेत. अजित पवार शिवतारेंच्या विरोधात काय बोलणार याकडे लक्ष लागलेय.
Maharashtra Marathi News Live Updates : खासदार झालेले बजरंग सोनवणे भाषण करताना वेगळेच बोललेबीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये आयोजित जाहीर सभेत बोलताना आपण आदरणीय जंरांगे पाटील यांच्यामुळेच आमदार झाल्याचे म्हटले होते.. भाषण करताना ओघात असे ते बोलून गेले परंतु आता यावरून बजरंग सोनवणे यांना सोशल मीडियातून ट्रोल केले जात असून बजरंग सोनवणे हे खासदार झालेले असताना जरांगे पाटील यांनी मला आमदार केल्याचे म्हटल्याने, याची जोरदार चर्चा होत असून हा व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसत आहे..
Maharashtra Marathi News Live Updates : मविआ आज जाहीर करणार महाराष्ट्रनामा नावाने जाहीरनामामविआ आज जाहीर करणार महाराष्ट्रनामा नावाने जाहीरनामा
या जाहिरनाम्यातून मविआ जाहिर कारणार सरकारच्या पुढील 100 दिवसांचा रोडमॅप
सरकार आल्यानंतर सुरुवातीला पाच गॅरंटी पूर्ण करण्याकडे असणार लक्ष
या जाहिरनाम्यातून मविआचं टार्गेट 2029 विधानसभा निवडणूक
Manoj jarange News Live Updates: ज्याला पाडायचे त्याला पाडा - मनोज जरांगेज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचे त्याला आणा. संभ्रम आहे असे सांगितले जात आहे. संभ्रम नकोच.काय करायचे आणि काय करायचं याबाबत संभ्रम निर्माण केले जात आहेत.
Pune Crime : हडपसर विधानसभेचे उमेदवारावर हल्लाबेकायदा बांधकामांना विरोध करणाऱ्या हडपसर विधानसभा उमेदवारावर पुण्यात हल्ला करण्यात आला.प्रहार पक्षाकडून हडपसर मतदारसंघातून आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला पुण्यात अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांविरोधात आवाज उठवल्याबद्दल पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केली.
संजय राऊत, शिवसेना(UBT) सरकार कोणाच्या बापाचे नाही, संजय मंडलिकेने किती पक्ष बदलले याचा इतिहास पाहिला पाहिजे Maharashtra News Live Updates: कार्तिकीसाठी पंढरपुरात भाविकांची गर्दीदोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या कार्तिक यात्रेसाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विठ्ठल दर्शनासाठी तीन किलोमीटर पर्यंत रांग गेली आहे. गोपाळपूर रोडवरील जवळपास सहा पत्र शेड भाविकांनी भरले आहेत.
यंदा मोठ्या संख्येने भाविक कार्तिकी साठी येण्याची शक्यता आहे. या दृष्टीने मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य, चहा,नाश्ता ,जेवण आधी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांना उकाड्याचा त्रास होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पंखे कुलरची व्यवस्था केलेली आहे. 12 नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे .पंढरपुरात सध्या लाखो भाविक दाखल झाले असून विठू नामाच्या गजराने पंढरी नगरी अवघे दुमदुमून गेली आहे.
Washim News Live : वयोवृद्ध आणि चालता न येणाऱ्या दिव्यांग अश्या 1,381 मतदारांनी बजावला घरून मतदानाचा हक्कवाशिम जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात मागील दोन दिवसांपासून गृह मतदान प्रक्रिया सुरू असून यासाठी नोंदणी केलेल्या 1454 मतदारांपैकी आतापर्यंत 1381 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ८५ वर्षांवरील वयोवृद्ध आणि चालता न येणाऱ्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचणे अशक्य होते. परिणामी, ते मतदानापासून वंचित राहू शकतात. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने प्रशासनाला अशा मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
pune : आमदार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी मैदानातमहायुतीचे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांची प्रचार पदयात्रा वानवडी गावठाण वानवडी बाजार फातिमानगर जांभुळकर नगर आणि आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये झाली. या प्रचार रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. संरक्षणासाठी हा भाऊ तुमच्या बरोबर खंबीर उभा असून लाडकी बहीण योजना पाच वर्षे चालू ठेवू असा जमलेल्या लाडक्या बहिणींना विश्वास दिला,या पदयात्रेला जमलेल्या प्रचंड गर्दीवरून असे लक्षात केलेलं कामांची ही पावती असल्याचे यावेळी सांगण्यात आलं.
Pune News : पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सवलतमतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पूना होटेलियर्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या ७४ हॉटेल्समध्ये मतदान केलेल्या मतदारांच्या देयकावर २० व २१ नोव्हेंबर रोजी १० टक्के सूट देण्यात येणार
Maharashtra News Live Updates: सोलापूरमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्काकाँग्रेसच्या 5 माजी नगरसेवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश
सोलापूर शहर मध्यची जागा मोची समाजाला नदिल्याने घेतला निर्णय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 5 माजी नगरसेवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय..