पुणे जिल्ह्यात पवार विरुद्ध थोपटे हा संघर्ष उघडउघड नाहीतर सुप्त होतच राहिला. लोकसभा निवडणुकीतही आमदार संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दर्शवत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात प्रचार केला होता. याचा काहीसा राग अजितदादांच्या मनात नक्कीच आहे. यातच एका सभेत अजितदादांनी संग्राम थोपटे यांची मिमिक्री करत निशाणा साधला होता. याला संग्राम थोपटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अजितदादांनी काय म्हटलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ मुळशी येथे अजितदादांनी सभा घेतली होती. “भोरच्या बसस्थानकाची काय अवस्था आहे? एस.टी स्टॅण्ड आहे की पीकअपचं शेड कळेना… येऊन बघा बारामतीचं बसस्थानक कसं आहे,” असं म्हणत अजितदादांनी थोपटेंवर टीका केली होती. “लोकप्रतिनिधीच्या अंगात पाणी असावं लागतं. लोकप्रतिनिधी खमक्या असावा लागतो. प्रशासनावर त्याची पकड असावी लागते,” असं बोलत अजितदादांनी संग्राम थोपटेंची मिमिक्री केली होती.
– Advertisement –
हेही वाचा : “लोकसभेला आमचा कार्यक्रम केला, आमच्या पाटलांच्या भाषेत सांगायचं तर…”, अजितदादांची फटकेबाजी अन्…
कायम भोरचे पाणी पळवलं…
– Advertisement –
याला प्रत्युत्तर देताना संग्राम थोपटे म्हणाले, “जसं-जसं निवडणूक जवळ येते जाईल, तस-तसे भोर तालुक्यात नेत्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत. या नेत्यांनी कायमस्वरूपी भोर तालुक्याचे पाणी पळवल्याचा प्रयत्न केला असून माझ्याबद्दल मुळशीत येऊन माझ्या अंगात पाणी नाही, अशी टीका केली.”
विधानसभेला पाणी पाजणार…
“त्या नेत्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की, माझ्या अंगात किती पाणी आहे, हे लोकसभेला दाखवलं आहे. येणाऱ्या विधानसभेलाही भोरची आणि मतदारसंघातील जनता तुम्हाला चांगल्या पद्धतीचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा थोपटेंनी अजितदादांना दिला आहे.
समाचार घेणार…
“आम्ही सुसंस्कृत आहोत. पण, प्रचाराच्या सांगता सभेत अजितदादांच्या टीकेचा समाचार घेतला जाईल,” असंही थोपटेंनी सांगितलं आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा नेता ‘बालिश’ म्हणाले, अमित यांनी मोजक्या शब्दांत संपवला विषय; पत्नीलाही हसू आवरेना