आरोग्य टिप्स : रात्री उशिरा पार्ट्यांचा आनंद घ्यायचा? मग त्याची काळजी घ्या
Marathi November 10, 2024 08:24 PM

पार्टीला जाणे ही आजकालच्या जीवनशैलीचे एक रुटीन मानले जाते. आपण आजूबाजूला कायम अशी तरूण मंडळी पाहतो, जे लेट नाइट पार्टी सतत एन्जॉय करत असतात. महिन्यादोन महिन्यातून अशी एक तरी पार्टी ही मंडळी अटेंड करतात. पण, पार्टी एन्जॉय करताना आरोग्याची होणारी हेळसांड किंवा भविष्यात निर्माण होणाऱ्या तक्रारींचा विचार करत नाही. अशा वेळी तुम्ही लेट नाइट पार्टीज आणि आरोग्य यातून मध्यस्थ काढत पार्टी एन्जॉय करून आरोग्याची काळजी घेऊ शकता.

  • तुम्ही लेट नाईट पार्टीला जाणार असाल तर दिवसभर खात राहू नका. दिवसभर खाताना संतूलित आहार घेणे फायदेशीर ठरेल. पार्टीत खातात विचार करून खावे, कारण पार्टीमध्ये बरेच स्नॅक्स, तेलकट, जंक फूडचा समावेश असतो. असे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे पार्टीत खाताना फायदे आणि नुकसान याचा विचार करावा.
  • अनेकजणांना सवय असते, पार्टीला जायचं तर उपाशीपोटी घरातून निघणे. पण, आरोग्याच्या दृष्टीने ही सवय चुकीची आहे. तुम्ही पार्टीला जायच्या आधी थोडंतरी खायला हवी, जेणेकरून पार्टीमध्ये अनहेल्दी खाणे कमी होते.
  • पार्टीमध्ये गेल्यावर सलाड सारख्या गोष्टीनी खाण्यास सुरूवात करावी. सुरूनात जड अन्नपदार्थानी करू नये. याशिवाय ओवग इटिंगपासून लांब राहावे.
  • पार्टीचा आनंद घेताना उभं राहून पाणी पिऊ नये आणि चुकूनही उभे राहून पदार्थ खावू नयेत. याशिवाय प्रत्येक घास व्यवस्थित चावून खावा. ज्यामुळे पचन व्यवस्थित होते. परिणामी, तुमची भूक कंट्रोलमध्ये राहते.
  • काही वेळा पार्टीचा आनंद घेण्याच्या नादात पाणी प्यायला आपण विसरतो. ज्यामुळे थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे अशा तक्रारी जाणवतात. पण, जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा पचनसंस्था सुरळीतपणे काम करू शकते आणि त्वचेचे आरोग्य देखील उत्तम राहते.
  • पार्टीमध्ये मद्याचे सेवन करू नये. त्याऐवजी फ्रेश ज्यूस किंवा लिंबू पाणी प्या. हे शरीरासाठी फायदेशीर असतात.
  • पार्टीमध्ये गोड जास्त प्रमाणात खावू नये. जर घरात कोणाला डायबिटीज असेल तर गोडापासून लांबच राहावे.
  • पार्टीतून घरी गेल्यावर थोडावेळ चालावे. चालल्याने पचन सुरळीत होते. तुम्ही कमीत कमी 10 ते 15 मिनिटे चालावे.
  • पुरेशी झोप महत्त्वाची आहे. तुम्ही जेव्हा लेट नाइट पार्टीला जाता तेव्हा तुमची झोप अपूर्ण होते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी शक्यतो रात्री पार्टीला जाणे टाळावे.

 

 

 

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.