पनीर गुलाब जामुन रेसिपी
Webdunia Marathi November 13, 2024 04:45 PM

साहित्य-

250 ग्रॅम पनीर

1/2 चमचा बेकिंग पावडर

1 कप साखर

तळण्यासाठी तेल

2 चमचे मैदा

1/6 चमचा मीठ

2 कप पाणी

कृती-

सर्वात आधी पनीर हाताने चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यावे. आता एका भांड्यात पनीर ठेवावे. पनीरमध्ये मैदा,मीठ, बेकिंग पावडर, साखर घालावी. व हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता गुलाब जामुन तयार करण्यासाठी पनीरचे छोटे गोळे बनवावे. कढईत तेल गरम करा आणि गुलाब जामुन सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे. आता एका पातेल्यात पाणी घालावे व उकळून घयावे.तसेच आता साखर घालावी. व पाक तयार करावा. गॅस बंद केल्यानंतर पाकात थोडी वेलची घालावी. व तळलेले गुलाब जामुन घालून साधारण 3 तास असेच ठेवावे. चविष्ट पनीर गुलाब जामुन तयार आहे. वरतून ड्रायफ्रूट्स घालू शकतात.

तर चला तयार आहे पनीरचे गुलाबजामून रेसिपी.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.