कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
आप्पासाहेब शेळके November 14, 2024 11:13 AM

धाराशिव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Assembly Elections 2024) बिगूल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (Shiv sena) पक्षफुटीवेळी एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) साथ सोडून मुंबईकडे परतणारे आमदार कैलास पाटील (kailas Patil) यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena UBT)  धाराशिव विधानसभा मतदारसंघात (Dharashiv Assembly Constituency) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या समोर शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे यांचं आव्हान आहे. काही दिवसांपूर्वी अजित पिंगळे यांनी शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले होते, असा आरोप केला होता. आता कैलास पाटील यांचे जुन्या सहकाऱ्याने खळबळजनक दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

शिवसेना आमदार कैलास पाटील हे उध्दव ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांच्या निष्ठेची स्टोरी खोटी असल्याचा दावा त्यांचे जुने सहकारी असलेल्या कळंब येथील माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे केला आहे. बंडावेळी ट्रकमध्ये बसून मी परत आलो असं कैलास पाटील यांनी सांगितलं. मात्र ते खोटं होतं. खासदार ओमराजे निंबाळकर यांना एका शाखा प्रमुखाकडून आमदार परत घेऊन ये म्हणून धक्काबुक्की झाली. त्यावेळी ओमराजे यांनी सतत फोन केले. 

वडिलांनी आत्महत्येची धमकी दिल्यामुळे कैलास पाटील परतले माघारी

तसेच  त्यांच्या वडिलांनी मी जिवाचं बर वाईट करून घेतो, मग तू येशील अशी धमकी दिल्यामुळे कैलास पाटील सुरतच्या रस्त्यावरून परतले. त्यावेळी कैलास पाटील हे पायी चालत आले नाही,  तर तानाजी सावंतांनी त्यांना गाडी दिली होती, असं शिवाजी कापसे यांनी म्हटलं आहे. आपल्याला ही माहिती तानाजी सावंत यांनी दिल्याचा दावा देखील कापसेंनी केला आहे. 

शिवाजी कापसेंचा दावा चर्चेत 

धाराशिव विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या अजित पिंगळे  आणि  शिंदे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांच्याकडून केला जातोय. त्यावर शिवाजी कापसे यांचा हा दावा चर्चेचा विषय बनलाय. उध्दव ठाकरेंची शिवसेना सोडून नुकतेच कापसे हे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य

MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.