पंचांग -
१४ नोव्हेंबर २०२४ साठी गुरुवार :
कार्तिक शुद्ध १३/१४, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ४.३६, चंद्रास्त पहाटे ५.५०, वैकुंठ चतुर्दशी, आवळी पूजन- भोजन, आवळीच्या झाडाखाली विष्णूपूजन, अरुणोदयी शिवपूजन, श्री गोरक्षनात्र प्रकट दिन, भारतीय सौर कार्तिक २३ शके १९४६.
दिनविशेष -
२०११ : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ‘द वॉल’ या विशेषणाला जागत राहुल द्रविडने ३६वे कसोटी शतक पूर्ण केले.
२०१५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पातळीवरील स्मारकाचे लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करून महाराष्ट्र सरकारने या महान नेत्याला मानवंदना दिली.