अमित ठाकरेंना मत का देऊ नये, एकही कारण सापडत नाही, पण... संजय मोनेंच्या एका वाक्याची जोरदार चर्चा
अपूर्वा जाधव November 14, 2024 02:13 PM

Sanjay Mone on Amit Thackeray :  दिग्गज अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत राजपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासाठी एक खास पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी अमित ठाकरे यांना मत का द्यावं यासाठी 10 महत्त्वाचे मुद्दे सांगितले होते. पण विशेष लक्ष वेधून घेतलंय. अमित ठाकरेंना मत का देऊ नये यासाठी केवळ एकच कारण संजय मोने यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या कारणाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. 

माहीमच्या मतदारसंघातून अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात त्यांच्यासमोर शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत यांचं आव्हान आहे. राजपुत्र मैदानात असल्यामुळे माहीम मतदारसंघाकडे सगळ्यांचच लक्ष लागून राहिलं आहे. असं असतानाच संजय मोनेंनी अमित ठाकरेंसाठी केलेल्या पोस्टमध्ये एका वाक्याने विशेष लक्ष वेधून घेतलंय. 

संजय मोने यांनी मत न देण्याचं एक कारण सांगितलं पण...

संजय मोने यांनी अमित ठाकरे यांना मत न देण्याचं एक कारण अगदी शोधून काढल्याचं म्हटलंय. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की,  'आता अमित ठाकरेंना मत का देऊ नये याबद्दल खूप विचार करुनही मुद्दा सुचेना. पण तरीही तो शोधला. अमित ठाकरे अनुभवी नाहीत.पण तो आपणच त्यांना निवडून दिलं तर सहज मिळू शकेल.'

अमित ठाकरे यांना मत देण्यासाठी सांगितलेल्या दहा मुद्द्यांमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, वेगात वाहन चालवून अपघात केल्याची एकही नोंद नाही. तसेच त्यांनी म्हटलं की, शिवाजी पार्क ला जर तुम्ही दिवाळीच्या सुमारास गेला असाल तर त्यांच्या पक्षाने एक जागा निश्चित केली होती तिथे  या वर्षी काही हजार तरुण तरुणी येऊन दिवाळी एकत्रपणे साजरी करत होते.आणि पार अकरा बारा वाजे पर्यंत निर्धास्त पणे वावरत होते. अशा अनेक मुद्दे संजय मोने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मांडले आहेत.       

मनसेच्या व्यासपीठावरुन शरद पोंक्षे, संजय नार्वेकर यांनी खणखणीत भाषणं ठोकलीत. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी पक्षासोबत सिनेसृष्टीही प्रचारासाठी कसोशीचे प्रयत्न करताना दिसतेय. संजय मोने यांनी कलाकारांना विनंती करत अमित ठाकरेंना मत देण्यासाठीचे महत्त्वाचे 10 मुद्देही सांगितले आहेत. 

ही बातमी वाचा : 

Marathi Actress : 'चंद्रकांत कुलकर्णीमुळेच इंडस्ट्रीत गटबाजी आली', ज्येष्ठ अभिनेत्रीचे गंभीर आरोप

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.