Children's Day Special Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चवदार रोटी पिझ्झा, सोपी आहे रेसिपी
esakal November 14, 2024 03:45 PM

Tasty Roti Pizza Recipe: दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. बालदिन हा पंतप्रधान पंडीत नेहरू यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. तुम्हालाही हा बालदिन तुमच्या मुलांसाठी खास बनवायचा असेल, तर रोटी पिझ्झा बनवू शकता. ही रेसिपी मुलांसाठी आरोग्यदायी तसेच चवदार आहे. चला तर मग जाणून घेऊया रोटी पिझ्झा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

रोटी पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

-2 रोट्या

- 2 चमचे पिझ्झा सॉस

- 1 शिमला मिरची

- 1 कांदा

- 1/4 टीस्पून ओरेगॅनो

- 1/4 टीस्पून चिली फ्लेक्स

- 1/2 कप मोझेरेला चीज

- 1 टेबलस्पून कॉर्न

- 2 चमचे पनीर

- आवश्यकतेनुसार चीज

- आवश्यकतेनुसार बटर

रोटी पिझ्झा बनवण्याची कृती

रोटी पिझ्झा बनवण्यासाठी सर्वात आधी सिमला मिरची, कांदा आणि चीज बारीक चिरून घ्या. कॉर्न देखील उकळवा. आता तवा गरम करून त्यावर थोडे बटर लावून दोन्ही बाजूंनी मंद आचेवर रोटी शिजवा. यानंतर, रोटीवर थोडे चीज पसरवा आणि पिझ्झा सॉसचा पातळ थर पसरवा. आता रोटीवर किसलेले मोझेरेला चीज लावा आणि त्यात चिरलेली सिमला मिरची, चीज, कांदा आणि उकडलेले कॉर्न देखील घाला. भाजी रोटीवर पसरवा जेणेकरून संपूर्ण रोटी झाकून जाईल. यानंतर, भाज्यांवर किसलेले मोझरेला चीजचा थर पसरवा. आता तव्यावर रोटी पिझ्झा ठेवा आणि मंद आचेवर झाकण ठेवा. चीज पूर्णपणे वितळेपर्यंत आणि रोटी किंचित कुरकुरीत होईपर्यंत पिझ्झा शिजवा. जेव्हा सर्व वितळते तेव्हा गॅस बंद करा आणि पॅनचे झाकण काढा. तुमचा रोटी पिझ्झा तयार आहे. ते पॅनमधून काढा आणि कटरच्या सहाय्याने त्याचे तुकडे करा. यानंतर त्यात ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून मुलांना गरमागरम सर्व्ह करा. मुल आवडीने खातील.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.