Happy Kartik Purnima 2024 Wishes Images, Status, Quotes, Photos, Messages, Pics in Marathi: हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी कार्तिक पौर्णिमा कार्तिक महिन्याच्या शेवटच्या तारखेला येते. याला देव दिवाळी असेही म्हटले जाते. या दिवशी स्नान आणि दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला भगवान शिवप्रभूंनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असे मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. यावर्षी कार्तिक पौर्णिमा 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 06:19 वाजता सुरू होईल आणि 16 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 02:58 वाजता संपेल. उदय तिथीनुसार 15 नोव्हेंबर 2024 रोजी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाईल. यानिमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजनांना येथे दिलेले शुभेच्छा संदेश पाठवू शकता.