उद्धव ठाकरे की राज ठाकरे.... 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?
Times Now Marathi November 14, 2024 05:45 PM

Dadar Shivaji Park Ground for Election Rally: चांगलाच रंगात आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून सभांचा धडाका सुरू आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कचे मैदान हे राजकीय पक्षांच्या सभेसाठी फार महत्त्वाचे मानले जाते. या मैदानात सभा घेण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आग्रही असतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीची सांगता सभा घेण्यासाठी 17 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांकडून अर्ज करण्यात आला आहे. अद्याप या दोन्ही पक्षांपैकी कोणालाही परवानगी मिळालेली नाहीये. पण सभेसाठी मनसेला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाणून घ्या कारण...

17 नोव्हेंबरला प्रचारसभेसाठी प्रचारसभेसाठी परवानगी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दोन्ही पक्षांनी आपले अर्ज मुंबई मनपाकडे दाखल केले आहेत. शिवाजी पार्क मैदानावर कोणाला सभेची परवानगी मिळणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये. मात्र, हे मैदान मनसेला मिळण्याची दाट शक्यता आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवाजी पार्क मैदानाबाबत मुंबई महानगरपालिकेच्या धोरणानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येते. 17 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, मनसेचा अर्ज आधी दाखळ झाल्याने शिवाजी पार्क मैदानात सभेसाठी राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवाजी पार्क मैदानात सभेसाठी परवानगी अद्या मिळालेली नसल्याने मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी खबरदारीचा उपाय म्हणून बीकेसीतील मैदानासाठी अर्ज दाखल केला आहे. बीकेसीतील दोन स्वतंत्र मैदानावर या सभा होऊ शकतात. पण एकाच दिवशी दोन पक्षांच्या सभा एकाच ठिकाणी होणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

17 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन असतो. या दिवशी बाळासाहेबांच्या समृतीला अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या समृतीस्थळावर येत असतात. आता या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सभेसाठी परवानगी मिळते का? हे सुद्धा पहावं लागेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.