Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल
Saam TV November 14, 2024 05:45 PM

सोशल मीडियावर अनेकदा लग्नातील घडलेल्या कार्यक्रमांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी नवरा-नवरीचा डान्स तर कधी जेवणावरुन व्यक्तीमध्ये झालेली हाणामारी. सध्या सोशल मीडियावर लग्नातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात जेवणातील एक कार्यक्रम आहे. मात्र तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक कार्यक्रम सुरु असलेला दिसत आहे. ज्या कार्यक्रमात असलेले सर्व व्यक्ती जेवणासाठी बसलेले दिसत आहे. व्यवस्थित जेवणाची पंगत सुरु आहे. या पंगतीत बसलेले पाहुणे एका अनोख्या पद्दतीने बनवलेल्या ताटात जेवण करत आहेत. त्यांना बसण्यासाठी मोर पिसा डिझाईनचे आसन आहेत. सर्व (Video) तेथील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शुट केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अकाउंटवरील ''error69'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला नेटकऱ्यांनी हजारोंच्या घरात लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' साऊथ इंडिया रॉक अंबानी शॉक'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''जेठालाल गडा यांचे कौटुंबिक कार्यक्रम'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे असे पहिल्यांदा पाहिले'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.