सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
राजू सोनावणे November 15, 2024 07:13 PM

Rahul Gandhi : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोयाबीनसाठी 7 हजार दर देण्याची घोषणा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही छत्रपती संभाजीनगरमधून याबाबत सुतोवाच केल्यानंतर आता काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा करताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सोयाबीनसाठी 7 हजार भाव अधिक बोनस देण्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल यांनी सोबत कांद्याला उचित भाव देण्यासाठी समिती नेमण्यात येईल आणि कापसासाठी सुद्धा उचित भाव दिला जाईल अशी घोषणा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. राहुल गांधी यांनी महाविकास आघाडी राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल उचललं असल्याचे म्हटले आहे. 

सोयाबीनच्या पडलेल्या भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी हवालदार झाले आहेत. उत्पादन खर्चाचा विचार करता पदरात काय पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे संवाद साधला होता. पिकांसाठी होणारा खर्च आणि हातामध्ये काय पडते यासंदर्भात त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. आता राहुल गांधी यांनी थेट शेतकऱ्यांसाठी घोषणा केली आहे. 

महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी हताश 

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला होता. राहुल म्हणाले होते की,  2021 मध्ये सोयाबीनचे भाव 10,000 रुपयांपर्यंत होते पण आता शेतकऱ्यांना MSP पेक्षा कमी किमतीत विकावे लागत आहे. सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4,892 रुपये आहे, परंतु शेतकऱ्यांना सुमारे 4,200 रुपयांना विकावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना यापेक्षाही कमी भाव मिळत आहे. चांगले उत्पादन होऊनही योग्य भाव न मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड नाराज आहेत. महाविकास आघाडीला शेतकऱ्यांच्या समस्या कळतात. आम्ही सरकार स्थापन करताच योग्य किंमत देण्याचा मार्ग शोधू.

शेतकऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान मी याचा पुनरुच्चार केला की, त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही 'कृषी समृद्धी' अंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची हमी दिली आहे. याशिवाय 'महालक्ष्मी' अंतर्गत कुटुंबातील महिलांच्या खात्यात दरमहा 3000 रुपये जमा झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

असे महाराष्ट्रातील शेतकरी मला सांगत होते

  • सोयाबीन पिकवण्याची किंमत: ₹4000/क्विंटल
  • सोयाबीनची विक्री किंमत: ₹3000/क्विंटल
  • शेतकऱ्यांचे नुकसान: ₹1000/क्विंटल

उत्पन्न दुप्पट करण्याचे विसरून भाजपने शेतकऱ्यांना त्यांच्या किमतीच्या तीन चतुर्थांश दराने पिकांची विक्री करण्यास भाग पाडले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.