Mohammad Shami : 2 सिक्स आणि 2 फोर, मोहम्मद शमीचा बॅटिंगनेही धमाका, ऑस्ट्रेलियाला टेन्शन
GH News November 15, 2024 07:13 PM

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने दुखापतीनंतर जवळपास वर्षभरानंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेतून अप्रतिम कमबॅक केलंय. मोहम्मद शमी याने बंगालकडून खेळताना मध्यप्रदेश विरुद्धच्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर आता शमीने बॅटिंगनेही धमाका केलाय. शमीने अखेरच्या क्षणी छोटी पण महत्त्वाच्या धावा जोडल्या. त्यामुळे मध्यप्रदेशला दुसऱ्या डावात बंगाललासमोर 250 पेक्षा अधिक धावा करुन 300 पेक्षा अधिक धावांचं आव्हान देता आलं. शमीच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलंय असं म्हटलं तर चूक ठरणार नाही.

मोहम्मद शमीची बॅटिंग

शमीने दहाव्या स्थानी बॅटिंगसाठी येत 102.78 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. शमीने 36 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 खणखणीत सिक्सच्या मदतीने 37 रन्स केल्या. मात्र त्यानंतर मध्यप्रदेशचा गोलंदाज कुमार कार्तिकेय याने शमी आऊट केलं. शमीला स्टंपिंग झाला. शमी बाद होताच बंगालचा दुसरा डाव हा 276 धावांवर आटोपला. बंगालकडे पहिल्या डावातील 61 धावांची आघाडी होती. त्यामुळे मध्यप्रदेशला विजयासाठी 338 धावांचं आव्हान मिळालं आहे.

शमीने त्याआधी पहिल्या डावात 19 ओव्हरमध्ये 54 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. शमीने या 4 विकेट्स घेत मध्यप्रदेशला 167 धावांवर रोखण्यात निर्णायक भूमिका बजावली. तसेच शमीच्या या 4 विकेट्समुळे बंगालला 61 धावांची आघाडी मिळवण्यात मदत झाली. बंगालने पहिल्या डावात सर्वबाद 228 धावा केल्या होत्या.

दरम्यान टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाला दौऱ्याला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्यांदाच बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या इतिहासात 5 सामने खेळवण्यात येणार आहे. मात्र शमीला दुखापत असल्याने त्याची निवड करण्यात आली नाही. मात्र आता शमी फिटनेस टेस्ट पाऊस होऊन मध्यप्रदेशविरुद्ध बॉलिंगसह बॅटिंगनेही धमाका केलाय. त्यामुळे आता निवड समिती शमीचा केव्हा समावेश करणार? याकडे लक्ष असणार आहे.

मध्य प्रदेश प्लेइंग इलेव्हन : शुभम शर्मा (कर्णधार), हिमांशू मंत्री (विकेटकीपर), रजत पाटीदार, हरप्रीत सिंग भाटिया, व्यंकटेश अय्यर, सुभ्रांशु सेनापती, आर्यन पांडे, सरांश जैन, कुमार कार्तिकेय, अनुभव अग्रवाल आणि कुलवंत खेजरोलिया.

बंगाल प्लेइंग इलेव्हन : अनुस्तुप मजुमदार (कॅप्टन), शुवम डे, सुदीप चॅटर्जी, सुदीप कुमार घरामी, शाहबाज अहमद, मोहम्मद कैफ, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रिटिक चॅटर्जी, सूरज सिंधू जयस्वाल, मोहम्मद शमी आणि रोहित कुमार.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.