8 दिवसांनी सरकार बदलून दाखवा, मी तुमचं नशीब बदलवणार, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन, म्हणाले गद्दारांचा 'भुसा' पाडणार  
संदीप जेजुरकर November 15, 2024 08:13 PM

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांना (Farmers) परत एकदा मी कर्जमुक्त करुन दाखवणार म्हणजे दाखवणारचं असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख (UBT) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. तसेच सोयाबीनला हमी भाव देणार आहे. त्यामुळं 8 दिवसांनी तुम्ही सरकार बदलून दाखवा, मी तुमचं नशीब बदलणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.  तुम्ही केवळ सरकार नाही बदलणार तर तुमचे नशीब देखील बदलवणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मालेगावमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

काळोख बदलण्यासाठी तुमच्या हातात मशाल दिली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दारांचा भ्रष्ट कारभार बदलण्यासाठी, जाळण्यासाठी तुमच्या हाती मशाल दिली असल्याचे ते म्हणाले. आपल्यासमोर गद्दार तर उभा आहेत, पण अजून दोन मांजर उभे आहेत त्यांना मध्ये येऊ देऊ नका असेही ते म्हणाले. भाजपच्या पोटात गोळा आला आहे असे ठाकरे म्हणाले. 

आधी कर्म सांग मग धर्मयुद्ध कर, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

आजही मुस्लिम बांधव येऊन भेटत आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात धर्मयुद्ध करा पण आधी कर्म सांग मग धर्मयुद्ध कर असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. मी पुन्हा विजयाच्या सभेसाठी येईल. अद्वय हिरे यांना निवडून द्या असेही उद्धव ठाकरे म्हणाले. जो गद्दार सांगतोय माझे माझी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध आहेत, ते मी तोडून टाकले आहेत.यापुढे कोणताही गद्दार मालेगाव निवडून येणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या मतदार संघाला लागलेला कलंक पुसून टाकायची संधी आहे. गद्दाराने किती पैसा वाटला, कारण त्यांच्याकडे पैशाचा महापूर आहे, त्या पैशाला तुमचं आयुष्य विकू नका असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

गद्दारांचा 'भुसा' पाडणार 

गेल्यावेळी मी गद्दारांवर काही बोललो नव्हतो. तेव्हा गद्दाराने दाखवले की मी काही बोललो नाही. आज मात्र गद्दारांचा ' भुसा ' पाडणार असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी दादा भुसेंवर टीका केली. अन्नाची शपथ घेवून सांगतो गद्दारी करणारी ही ओलाद गाडल्याशिवय राहणार नाही असेही ते म्हणाले.ज्याने खोट्या केसेस केल्या तो किती मोठा 'दादा' असू दे त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय मी राहणार नाही.-माझे वडील चोरले पक्ष चोरले तुमच्या वडिलांचे कर्तुत्व काय असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील शिवसेना लुटून तुम्ही गुजरातला दिली असा टोलाही ठाकरेंनी लगावला. 

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.