Rohit Pawar on Ajit Pawar : महाराष्ट्रात आले की अमित शाह (Amit Shah) हे द्वेषाची भाषा करतात आणि गुजरातमध्ये गेले की विकासाची भाषा करतात असे म्हणत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी टीका केली. महायुतीत आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्यात बोलत आहेत, त्यांच्यात खुप वाद होत आहेत. सत्ता आल्यावर महायुतीत खूप वाद होतील त्यामुळे मविआलाच लोकांनी मतं द्यावीत असे आवाहन रोहित पवारांनी केलं. तसेच भाजपने अजितदादांची ताकद कमी केल्याचेही रोहित पवार म्हणाले. हरियाणात जो पक्ष भाजपसोबत आला त्याचा नेता देखील निवडून आला नाही. तशीच परिस्थिती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची होऊ शकते असेही रोहित पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत 60 टक्के खुर्च्या मोकळ्या होत्या. त्यामुळं जनतेने त्यांना योग्य उत्तर दिलं आहे असे रोहित पवार म्हणाले. मोदी जरी भाषणात चुकीची भाषा वापरत नसतील, तरी शाह चुकीची भाषा वापरत असल्याचे रोहित पवार म्हणाले. अमित शाह हे पंतप्रधान होण्याचा सराव करत आहेत की काय असं वाटतं. राज ठाकरे यांच्या जाहीरनाम्यावर देखील रोहित पवारांनी टीका केली आहे. राज ठाकरेंची पार्टी "वोट खाऊ पार्टी" असल्याचे रोहित पवार म्हणाले.
माझ्या विरोधकांना वाटत होतं की मी मतदारसंघात अडकून पडावं. पण मी राज्यातील 30 मतदारसंघात जाऊन प्रचार केला. कारण माझ्या मतदारसंघातील जनतेवर विश्वास असल्याचे रोहित पवार म्हणाले. पण माझ्या कार्यकर्त्यांवर गुंडागर्दी वाढू शकते. त्यामुळं प्रशासनाने अशा गुंडागर्दी करणाऱ्यांवर कारवाई करावी असे ते म्हणाले. दरम्यान, राम शिंदे यांनी मला भाषणादरम्यान शिवीगाळ केली आहे. पाशा पटेल यांनी सभेत बोलताना महिलांबाबत अपशब्द वापरले आहेत. जामखेड पोलिसांनी पाशा पटेल यांच्यावर महिलांनी गुन्हा दाखल केला असल्याचे रोहित पवार म्हणाले.
भाजपकडून अनेक बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भीती रोहित पवारांनी व्यक्त केली. पोलिसांकडून आम्हाला मदत केली जात नाही. विनापरवाना बंदुका वापरल्या जात असल्याचा रोहित पवारांनी आरोप केला आहे. पाशा पटेल यांच्या उपस्थितीत राम शिंदे यांच्यासाठी काल झालेल्या सभेदरम्यान अश्लील भाषेचा वापर केल्याचे रोहित पवार म्हणाले. दरम्यान, ज्या व्यक्तीला स्वतःच्या गावात विकास करता आला नाही त्या व्यक्तीला मतदारसंघात काय विकास करता येणार असे म्हणत रोहित पवारांनी राम शिंदेंवर टीका केली. राम शिंदेंकडून गुंडांचा वापर केला जाईल असं रोहित पवार म्हणाले.
मतं खाण्यासाठी मनसेने उमेदवार उभे केले आहेत. भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले आहेत. एकनाथ शिंदे हे अमित शाहा यांच्या खूप जवळ गेले आहेत. बटेंगे तो कंटेंगे यावर पंकजा मुंडे, नितीन गडकरी यांनी विरोध केला याचे स्वागत करत असल्याचे रोहित पवार म्हणाले. द्वेषामुळे लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न मिळत नाही असंही ते म्हणाले.
निवडणूकीत मतदारांना पैसे देण्यापेक्षा लाडकी बहीणच्या माध्यमातून पैसे देऊ या उद्देशाने महायुतीने लाडकी बहिण योजना आणल्याचे रोहित पवार म्हणाले. पण या योजनेचा मविआवर कुठलाही परिणाम होणार नाही असे रोहित पवार म्हणाले. भाजपचा विरोध संविधानाला आहे हे आधीपासूनच लोकांना माहिती आहे. भाजपने 550 कोटी रुपये हे फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी पाठवल्याचे रोहित पवार म्हणाले. रोहित पाटील यांच्या विरोधात गुंडागर्दीचा मोठा वापर केला जात आहे. आर आर आबांच्या काळात ज्या पोलिसांची भरती झाली असेल त्यांनी आबांच्या मुलासाठी मदत करा. रोहित पाटील यांच्या मतदारसंघात मोठा शस्त्रसाठा गेल्याचा रोहित पवाररांचा आरोप असल्याचे रोहित पवार म्हणाले. शेती पिकाचे भाव, महिला सुरक्षा यावर भाजप बोलूच शकत नाही असेही ते म्हणाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतदार संघात मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार वाढल्याचेही रोहित पवार म्हणाले.