Yavatmal District Vidhan Sabha Election 2024 यवतमाळ : यवतमाळच्या पुसद येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शरद मैंद यांच्या प्रचारार्थ सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा चांगलाच समाचार घेतला. गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने कधीच झाकला जाऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याची जोरदार टीका केलीय. पंतप्रधान मोदी यांनी सभेत 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारवर बोलले आणि गुलाबी जॅकेटवाले पवार साहेबांचे बोट सोडून भाजपच्या मांडीवर जाऊन बसल्याची टीका ही त्यांनी यावेळी केली. तसचे तुमच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या असे दाखविले जात आहे. या योजनांच्या जाहिरातीवर 15 दिवसात 700 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता कळू न देता दहा हाताने सामान्य नागरिकांच्या खिशातून हे पैसे काढण्याचे काम सुरू असल्याचेही खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले.
2019 ला युवकाला संधी दिली, मात्र 2 जुलै 2023ला पक्षात फूट पडली. गुलाबी रंग नेमका सांगतो काय? तर 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आणि भाजपच्या मांडीवर जाऊन ते बसले. विचारले तर विकासासाठी गेला असे सांगतात, तर नेमका एक तरी प्रकल्प पुसदमध्ये आणला का? कुणाला रोजगार इथल्या युवकाला मिळाला का? निव्वळ चाय पर सुरू झालेलं सरकार गाय पर अटक गयी, बात हुई 15 लाख की 1500 पे अटक गुई, असा मिश्किल टोलाही अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यासह सरकारला लगावला आहे.
सत्ताधाऱ्यांनी तुमच्यासाठी जी योजना आणली त्याच्या जाहिरातीवर 15 दिवसात 700 कोटी खर्च केलाय. योजना दाखवून दहा हाताने खिशातून पैसे काढत आहे, असे हे सरकार आहे. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावत आहे. महायुती फक्त विकासाच्या गप्पा मारणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या पाहून 71 हजार कोटींची कर्ज माफी पवार साहेब यांनी केली. ज्या विकासासाठी गुलाबी गॅंग सत्तेत सामील झाली तेव्हा विकास कुठे गेला होता. शेतीला भाव नाही. 9 महिन्यात आकडेवारी पहिली तर 1900 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. हा विकास नाही भकास आहे. दिल्लीतुन वाजले की माना हलविणारे सरकार आहे. प्रत्येक उद्योग धंदा गुजरातला जात आहे. महाराष्ट्रात भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करनारे सरकार आहे, अशी टीकाही अमोल कोल्हे यांनी सरकारवर केली आहे.
हे ही वाचा