आधी कर्णधारपद सोडलं, आता अचानक निवृत्तीची घोषणा; WTC दरम्यान टीम साऊथीचा क्रिकेटला रामराम
Marathi November 15, 2024 08:24 PM


न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथीने निवृत्तीची घोषणा केली आहे. डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका संपताच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणार असल्याचे टीमने जाहीर केले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये चूरस वाढलेली असतानाच टीम साऊथीने निवृत्तीचा निर्णय घेतल्याने न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.



न्यूझीलंडचा संघ नुकताच हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्याआधी टीम साऊथीने न्यूझीलंडचे कर्णधारपद सोडले होते. त्याच्या ऐवजी टॉम लेथम याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. टॉम लेथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने हिंदुस्थानवर 3-0 अशा ऐतिहासिक मालिका विजय मिळवला होता.

2008 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या टीम साऊथीने न्यूझीलंडकडून 104 कसोटी, 161 वन डे आणि 126 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 385 विकेट्स घेतल्या आहेत. तर वन डे मध्ये 221 आणि टी-20 मध्ये 164 विकेट्स त्याच्या नावावर आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.