उघडण्यापूर्वीच आयपीओ पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये शेअर्स तेजीत, कंपनीने सांंगितले 'हे' कारण
मुंबई :रोस्मेर्टा डिजिटल सर्व्हिसेजचा आयपीओ ( Rosmerta Digital Services IPO) उघडण्यापूर्वीच पुढे ढकलण्यात आला आहे. याआधी हा आयपीओ 18 नोव्हेंबरला उघडणार होता आणि 21 नोव्हेंबरला बंद होणार होता. मात्र, आता ही आयपीओ उघडण्याची तारीख पुढे ढकलली आहे. सध्या तरी कंपनीने नवीन तारीख जाहीर झालेली नाही. एसएमई सेग्मेंटमध्ये रोस्मेर्टा डिजिटल सर्व्हिसेज हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ मानला जात होता. त्याची किंमत 140-147 रुपये प्रति शेअर होती. यामध्ये 1.4 कोटी नवीन शेअर्स विक्रीला हाेते. कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 22 रुपयांच्या प्रीमियमसह व्यवहार करत आहेत.
कंपनीने काय सांगितलेकंपनीने सांगितले की, शेअर बाजारातील प्रतिकूल परिस्थितीमुळे 206 कोटी रुपयांचा आयपीओ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यासह बाजारात चालू असलेली घसरण लक्षात घेऊन आयपीओच्या तारखा पुढे ठकलणारी ही पहिली कंपनी ठरली आहे.. कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील. रोस्मेर्टा डिजिटल सर्व्हिसेज लिमिटेड ही रोसमेर्टा टेक्नोलॉजीज लिमिटेड (RTL) ची उपकंपनी आहे.
कंपनीचा व्यवसाय रोस्मेर्टा ही ऑटोमोटिव्ह घटक आणि सहाय्यक उपकरणांसाठी डिजिटली सक्षम सेवा प्रदान करते. हरियाणास्थित कंपनी मुंबईतील कार्यालयाची जागा खरेदी करण्यासाठी, भारतातील अनेक भागांमध्ये गोदामे, मॉडेल वर्कशॉप आणि अनुभव केंद्रे उभारण्यासाठी, आयटी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी आयपीओतून मिळणारे 118.5 कोटी रुपये खर्च करेल. उर्वरित निधी अधिग्रहण आणि इतर धोरणात्मक उपक्रम आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांद्वारे अजैविक वाढीसाठी वापरला जाईल.