दक्षिण चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपल्या 'पुष्पा: द राइज' चित्रपटातील शानदार भूमिकेमुळे चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. पुष्पराज या त्याच्या प्रतिष्ठित भूमिकेने त्याला देशभरात जबरदस्त लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्याच्या अभिनयाने त्याचं करिअर तर उंचावलं आहेच, शिवाय त्याला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून मोठ्या कंपन्यांकडून मानांकन मिळवून दिलं आहे. आता, 'पुष्पा 2: द रुल' रिलीज होण्यापूर्वी अल्लू अर्जुनला खऱ्या अर्थाने लॉटरीच लागली आहे. तो सध्या भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ब्रँड ॲम्बेसेडरपैकी एक बनला आहे.
अल्लू अर्जुनच्या अदाकारीमुळे त्याच्यावर फक्त चित्रपट रसिकांचंच नाही, तर विविध कंपन्यांचंही लक्ष गेलं आहे. 'पुष्पा: द राइज' च्या घवघवीत यशानंतर त्याच्या ब्रँड व्हॅल्यूत मोठी वाढ झाली आहे. विविध प्रसिद्ध कंपन्या आता त्याला आपल्या ब्रँडसाठी चेहरा म्हणून निवडू लागल्या आहेत. लोक त्याच्या साध्या परंतु प्रभावी स्टाइलला आणि देसी लुकला पसंती देतात. 'पुष्पा 2: द रुल'पूर्वी अल्लू अर्जुनची मागणीही एंडोर्समेंट मार्केटमध्ये वाढली आहे. आता हा सुपरस्टार आशियातील सर्वाधिक कमाई करणारा ब्रँड ॲम्बेसेडर बनला आहे. वास्तविक, अल्लू अर्जुन आता थम्स अप सारख्या मोठ्या सोडा ब्रँडचा चेहरा बनला आहे.
View this post on Instagram
सध्या, अल्लू अर्जुनने अनेक प्रतिष्ठित ब्रँडसोबत करार केला आहे, ज्यात फॅशन, फूड अँड बेव्हरेज, इलेक्ट्रॉनिक्स, हेल्थकेअर, आणि इतर क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे. त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन ब्रँड्स आपले उत्पादनं मोठ्या प्रमाणात बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अल्लू अर्जुनचा चेहरा दिसला, की लोक अधिक आकर्षित होतात, आणि यामुळे ब्रँडच्या कमाईत वाढ होण्यास मदत मिळते.कोल्ड ड्रिंक्सच्या जाहिरातीमुळे, अल्लू अर्जुन आशियातील सर्वाधिक कमाई करणारा ब्रँड ॲम्बेसेडर बनला आहे. यावरून त्यांची बाजारात प्रचंड लोकप्रियता सिद्ध होते. अल्लू अर्जुन हा भारतात आधीच सुपरस्टार आहे, पण आता त्याचा प्रभाव आशियामध्येही मजबूत होत आहे.
हेही वाचा :Kanguva Box Office Collection: कांगुवा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाईसाठी सज्ज, सूर्याचा 'कांगुवा' 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3'चे रेकॉर्ड मोडणार का?
'पुष्पा 2: द रुल' मुळे चाहत्यांमध्ये उत्सुकताअल्लू अर्जुनच्या करिअरमधील पुढचा मोठा टप्पा म्हणजे 'पुष्पा 2: द रुल'. चित्रपटाबद्दल अजून फारशी माहिती बाहेर आलेली नसली, तरी प्रेक्षकांनी त्याच्याबद्दल आतापासूनच चर्चा सुरू केली आहे. 'पुष्पा'च्या पहिल्या भागाने भारतातच नव्हे तर परदेशातही प्रचंड लोकप्रियता मिळवली, आणि त्यामुळे त्याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.अल्लू अर्जुन 'पुष्पा 2: द रुल' रिलीजसाठी सज्ज आहे. हा यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे जो 5 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.