'जर्नी' चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित, अकल्पित प्रवासाची कथा उलगडणारा एक थरारक अनुभव
जयदीप मेढे November 15, 2024 11:13 PM

Journey Trailer : एका अनपेक्षित प्रवासाची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’  चित्रपटाचा रहस्यमय आणि थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाची कथा स्वतः सचिन दाभाडे यांनी लिहिली असून, संवाद आणि पटकथेचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. चित्रपटाचे सहनिर्माते भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड आणि अनिकेत अरविंद बुटाला आहेत.

'जर्नी' चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित

सचिन जीवनराव दाभाडे यांची निर्मिती आणि दिग्दर्शन ‘जर्नी’  चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता चित्रपट मोठ्या पडद्यावर कधी येणार, याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहे. जर्नी चित्रपटात प्रेक्षकांना एक गूढ कथा अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘सचिन दाभाडे फिल्म्स’ निर्मित जर्नी चित्रपटात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, आणि निखिल राठोड हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

अकाल्पनिक प्रवासाची कथा उलगडणारा एक थरारक अनुभव

जर्नी चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक लहान मुलगा अचानक बेपत्ता होतो, ज्यामुळे त्याचे पालक चिंतेत पडतात आणि त्याला शोधण्यासाठी अथक प्रयत्न करतात. मुलगा बेपत्ता झाल्यामुळे त्याला शोधण्यासाठी आई-वडील सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांचा मुलगा कुठे आहे? मुलाला नेमक्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? आणि त्याचा प्रवास कायअसेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना 29 नोव्हेंबरला चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मिळणार आहेत.

अकल्पित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी'चा ट्रेलर

दिग्दर्शक सचिन दाभाडे यांनी या चित्रपटाविषयी बोलताना सांगितलं की, "जर्नी हा चित्रपट हा आजच्या जनरेशनचा फॅमिली सिनेमा आहे. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असताना नात्यात जो दुरावा वाढत जात आहे, तो या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. सिनेमात घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगामुळे प्रत्येकास नकळत झालेल्या चुकांची जाणीव होते. निमित्त 14 वर्षाचा मुलगा जेव्हा हरवतो तेव्हा घरातील प्रत्येकाची काय व्यथा होते, त्याला शोधण्यासाठी काय पराकाष्ठा करावी लागते आणि मग विचार येतो की, आपण कुठे कमी पडलो का? या सिनेमात प्रत्येक कलाकाराची मुख्य भूमिका आहे, अर्थात प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी बनलेला हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल."

आता 'नागिण' बनणार 'स्त्री', श्रद्धा कपूरच्या आगामी बिग बजेट चित्रपटाबाबत मोठी अपडेट

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.