PIB तथ्य तपासणी नवी दिल्ली: सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात येत असतात. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याच्या बाबत सोशल मीडियावर एक दावा केला जात होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी याच्या सन्मानार्थ एक नाणं जारी करणार आहे असा तो दावा होता. सोशल मीडियावर त्याबाबत अनेक दावे केले जात होते. आरबीकडून एमएस धोनीच्या सन्मानासाठी 7 रुपयांचं नाणं जारी केलं जाईल, असा दावा केला जात होता. 7 रुपयांच्या नाण्याचं लॉजिक देखील सांगितलं जात होतं. एमएस धोनीच्या जर्सीचा नंबबर 7 आहे त्यामुळं 7 रुपयांचं नाणं काढलं जाईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, पीआयबीनं याबाबत फॅक्ट चेक करत सत्य समोर आणलं आहे.
पीआईबी फॅक्ट चेकमध्ये एमएस धोनीबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यातील तथ्य समोर आलं. आरबीआयकडून असं कोणत्याही प्रकारचं नाणं जारी केलं जाणार नाही. याबाबत डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स अफेर्सनं देखील धोनीच्या नावानं काढल्या जाणाऱ्या दाव्याबाबत कोणतिही पोस्ट केलेली नाही.
“सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन पसरवला जात आहे, त्यात महेंद्रसिंह धोनीच्या क्रिकेटमधील महान कामगिरीच्या सन्मानार्थ 7 रुपयांचं नाणं नवं जारी केलं जाणार आहे. ”
फोटोत केला जाणारा दावा चुकीचा आहे.
डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स अफेअर्सचा दावा खोटा आहे.
देशाच्या वित्त मंत्रालयादेखील भ्रम पसरवल्या जाणाऱ्या पोस्ट संदर्भातील माहिती मिळाली होती. वित्त मंत्रालयानं तातडीनं याबाबत यावर कारवाई करुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पष्टीकरण देणारी पोस्ट केली आहे. पीआयबी फॅक्ट चेकनं ती पोस्ट रिपोस्ट केली आहे. यानंतर आरबीआयकडून किंवा डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स अफेअर्सनं नवं नाणं जारी केलं जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघानं आयसीसीच्या तीन स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं होतं. भारतीय क्रिकेट संघानं 2007 चा टी 20 वर्ल्ड कप, 2011 चा वनडे वर्ल्ड कप आणि 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं विजेतेपद मिळवलं. याशिवाय धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्जनं अनेकदा आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे. धोनी अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतोय. 2025 च्या आयपीएलमध्ये देखील तो खेळताना पाहायला मिळेल.
इतर बातम्या :
अधिक पाहा..