कनेडी परिसरात पावसाची हजेरी
esakal November 16, 2024 02:45 AM

कनेडी परिसरात
पावसाची हजेरी
कनेडी ः गेले आठ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. येथील पचंक्रोशीत गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे आज सकाळी भातकापणी थांबली होती. शेतात कापून ठेवलेले भात पावसामुळे भिजले आहे. आज सायंकाळीही पावसाने पुन्हा हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने कोकणात दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे पावसाचे सावट अजूनही आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.