रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाप, पत्नी रितिकाने दिला मुलाला जन्म
GH News November 16, 2024 04:05 AM

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, रोहितची पत्नी रितिका (Ritika sharma) हिने मुलाला जन्म दिला आहे. मुलीनंतर रोहित आता एका मुलाचा पिताही झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, रोहितची पत्नी रितिका हिने शुक्रवारी, 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत मुलाला जन्म दिला. या बातमीने रोहित आणि रितिका व्यतिरिक्त त्यांचे कुटुंब आणि त्यांचे सर्व चाहत्यांनी आनंद व्यक्त करत रोहितचे अभिनंदन केले. या आनंदाच्या बातमीने टीम इंडियाच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. कारण टीम इंडियाचा कर्णधार ऑस्ट्रेलिया मालिकेत सुरुवातीपासून खेळण्याची शक्यता वाढली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून रोहित लवकरच वडील होणार असल्याची चर्चा होती. ही आनंदाची बातमी कधी मिळेल याची फक्त प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षाही अखेर शुक्रवार 15 नोव्हेंबर रोजी संपली. भारतीय कर्णधाराने डिसेंबर 2015 मध्ये रितिकासोबत लग्न केले होते. यानंतर डिसेंबर 2018 मध्ये त्याची मुलगी समायरा हिचा जन्म झाला. आता नोव्हेंबर 2024 मध्ये भारतीय कर्णधाराच्या कुटुंबात आणखी एक सदस्य जोडला गेला आहे आणि मुलगी समायरा हिला लहान भाऊ मिळाला आहे.

रोहित आणि त्याच्या कुटुंबासाठी तसेच टीम इंडियासाठी (Team India) ही आनंदाची बातमी आहे. मुलाच्या जन्माची वाट पाहत असताना रोहित आपल्या सहकारी खेळाडूंसोबत कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकला नाही. पहिल्या कसोटीत तो खेळू शकणार नाही, अशी शक्यता होती. मात्र, आता या सर्व शंका दूर होतील, अशी आशा निर्माण झाली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे.

साहजिकच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आपल्या कर्णधारावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही आणि अशा परिस्थितीत रोहित पहिली कसोटी खेळू शकणार नाही. मात्र, बोर्डाने त्याला तत्काळ ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी केली असल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. रोहित तयार होताच त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवले जाईल. त्यानंतरही पहिली कसोटी खेळण्यासाठी तो मानसिक, शारीरिक आणि सरावाच्या दृष्टीने पूर्णपणे तयार होईल की नाही हे सांगणे कठीण आहे. मात्र, आता तो 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत हजेरी लावू शकतो हे स्पष्ट दिसत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.