मतदारांसाठी पाच लाख पाणी बॉटल
esakal November 15, 2024 10:45 PM

पिंपरी, ता. १५ ः विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिका पाच लाख पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देणार आहे. त्याचे वितरण पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांवर केले जाणार आहे.
शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीमध्ये आठपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या सुमारे २७ ठिकाणी मतदारांना सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नोडल अधिकाऱ्यांनी संबंधित मतदान केंद्रांवर उपस्थित सर्व यंत्रणांशी समन्वय ठेऊन सोपविलेले कामकाज करावे, असा आदेश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिला आहे.

मतदारसंघनिहाय आठपेक्षा
अधिक मतदान केंद्र ठिकाणे
मतदारसंघ / ठिकाणे
चिंचवड / ११
पिंपरी / ४
भोसरी / १२

मतदानासाठी अशीही मदत
- सुरक्षारक्षक कर्मचारी ः ३००
- महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान ः २५०
- हरित मतदान केंद्र ः १५
- एनसीसी स्वयंसेवक ः २७०

महापालिकेची तयारी
- शहरातील सर्व मतदार केंद्रांवरील रांगेतील मतदारांना पाणी बॉटल देणार
- रांगेतील मतदारांना बसण्यासाठी बेंच आणि खुर्च्या आणि आवश्यक ठिकाणी मंडप व्यवस्था
- पिंपरी, भोसरी, चिंचवड मतदारसंघात प्रत्येकी पाचप्रमाणे १५ हरित मतदार केंद्र असतील, पर्यावरणपूरक माहिती असेल
- सर्व मतदान केंद्रांवर विद्युत व्यवस्था असून आपत्कालीन परिस्थितीत जनरेटरची सोय
- मतदार केंद्रांवर स्वच्छतेसाठी अतिरिक्त सफाई कामगारांची नियुक्ती
- सर्व मतदार केंद्रांवर महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्या समन्वयाने पार्किंगची व्यवस्था
- मतदारांच्या सोईसाठी मतदान केंद्र स्थळदर्शक व दिशादर्शक फलक लावणार
- एकाच ठिकाणी जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदान केंद्राचे स्पष्ट बोध होण्यासाठी ‘कलर कोडिंग करणार
- एकापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदारांना ये-जा करण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त गेट

‘‘मतदान केंद्राच्या ठिकाणी किमान सुविधा उपलब्ध करून देताना कोणतीही कमतरता राहणार नाही, याची सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून कामकाज पार पाडावे.’’
- प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
---

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.