विधानसभा निवडणूक संपल्यावर काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन ओबीसी जनगणनेची मागणी मान्य करतील. तिथे ठराव मंजूर करतील की, ओबीसी जनगणनेची आकडेवारी नसल्याने त्यांचे शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षण थांबवण्यात येत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
स्लीप वाटण्यावरू भाजप कार्यकर्ते शिवसैनिकांमध्ये राडास्लीप वाटण्यावरून नाशिक पश्चिम मतदारसंघातील सावतानगर भागात भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात राडा झाला. स्लीप वाटण्यावरून दोन्ही पक्षातील कार्यकर भिडले. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अंबड पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली आहे.भाजपच्या माजी नगरसेवकाकडून त्यांच्यावर ठाकरेंच्या उमेदवाराकडून चाकू हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मनसेचा उमेदवाराची उद्धव ठाकरेंना पाठींबानांदगाव मतदारसंघात मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. सोनावला यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गणेश धात्रक यांना पाठींबा जाहीर केला आहे.
PM Narendra Modi Live News : PM मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाडपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान प्रचारसभेसाठी झारखंडमध्ये गेले होते. या सभेनंतर परतत असताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचं विमान तिथेच थांबवलं गेलं त्यामुळे मोदींना दिल्लीला येण्यास विलंब झाला.
Uddhav Thackeray Live News : सिल्लोडला लागलेला कलंक दूर करायचा आहे - उद्धव ठाकरेसिल्लोडला लागलेला कलंक दूर करायचा आहे, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला. तर सत्तार यांच्या पराभवासाठी थेट भाजपला विनंती करत त्यांच्याशी बोलण्याची तयारी देखील ठाकरेंनी दर्शवली आहे. ते म्हणाले, "भाजपला विनंती आहे, आपले मतभेद असतील. आपण त्यासाठी कुणाला बोलायला लागेल तर बोलू. त्यासाठी मी बोलायला तयार आहे. पण त्या अगोदर सिल्लोडला लागलेला कलंक दूर करायचा आहे."
BKC Metro Station Live News : बीकेसीतील मेट्रो स्टेशनला आगबीकेसीतील निर्माणाधीन अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीमुळे मेट्रो तीनच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर स्टेशनमधील प्रवाशांना बाहेर काढल्याची माहिती आहे.
Mumbai Crime News : एटीएस आणि 'एनसीबी'ची मोठी कारवाई! 500 किलोग्राम अमली पदार्थ जप्तगुजरातच्या पोरबंदरवरून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. गुजरात एटीएस आणि 'NCB'च्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. समुद्रात राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये तब्बल 500 किलोग्राम अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
Pankaja Munde Live News : भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या बॅगांची तपासणीधुळ्यातील सिंदखेडा येथे भाजप-महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारासाठी आलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणी करण्यात आली आहे.
Raj Thackeray Announced MNS Manifesto : राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलमनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 'राज्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यापेक्षा विद्यामंदीर बांधा आणि गडकिल्ले सुधारा', असं ते यावेळी म्हणाले.
Raj Thackeray Announced MNS Manifesto : मराठी भाषा आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य'आम्ही हे करू' या नावाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात महिलांची सुरक्षा, प्रशासन आणि उच्च शिक्षणात मराठीचा समावेश, मराठीचा अभिमान आणि सन्मान तसंच गड संवर्धन करण्यावर भर दिला आहे. शिवाय आम्ही हे करू यापेक्षा कसं करू हे देखील आम्ही सांगितलं असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी म्हणाले.
Manifesto of MNS : राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धविधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीनाम्याची टॅगलाईन 'आम्ही हे करू' अशी देण्यात आली आहे. या जाहीरनाम्यात मुलभूत गरजांचा उल्लेख करण्यात आला असून हा जाहीरनामा सर्वसामान्य जनतेचा असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपण 19 वर्षात काय केलं याची पुस्तिका काढली असल्याचंही सांगितलं.
Devendra Fadanvis on Batenge toh katenge : 'बटेंगे तो कटेंगे' घोषणा चुकीची नाही - फडणवीसउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू एकत्र आवाहन करताना 'बटेंगे तो कटेंगे' अशी घोषणा दिली होती. या घोषणेवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे महायुतीतील नेतेच योगींच्या या घोषणेशी आपण असहमत असल्याचं म्हटलं होतं. अशातच आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेचे कौतुक केलं आहे. या घोषणेत काहीही चुकीचे दिसत नसून हा आपल्या देशाचा इतिहास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मला योगीजींच्या घोषणेमध्ये काहीही चुकीचं दिसत नाही. या देशाचा इतिहास पाहा, जेव्हा-जेव्हा हा देश जाती, प्रांत आणि समुदायांमध्ये विभागला गेला तेव्हा, तेव्हा हा देश गुलाम झाला, असं फडणवीस म्हणाले.
Sanjay Raut Live News : 25 वर्ष युती असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री करायला नकार - राऊतठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, "अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं. पण शिवसेनेबरोबर 25 वर्ष युती असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. त्यामुळे फडणवीस खोट बोलत आहेत. मी त्या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये होतो. मुख्यमंत्रिपदाबाबत हे चर्चाच करायला तयार नव्हते या संदर्भात कोणतीही चर्चा होणार नाही, हे वारंवार सांगितलं जात होतं."
Uddhav Thackeray Live News : उद्धव ठाकरेंची तोफ आज सिल्लोडमध्ये धडाडणारशिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली आहे.
Nawab Malik Live News : नवाब मलिकांना हायकोर्टाचा मोठा दिलासाराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नवाब मलिक यांचा जामीन रद्दवर तात्काळ सुनावणी करण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी 4 डिसेंबरला होणार आहे.
Manifesto of MNS : आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणारविधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. राज ठाकरेंच्या हस्ते तो प्रसिद्ध केला जाणार आहे. तर या जाहीरनाम्याच्या माध्यमातून मनसे जनतेला काय आश्वासन देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.