Rosmerta Digital Services IPO: स्मॉल मीडियम इंटरप्राइज (SME) श्रेणीतील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या आयपीओला (IPO) आता ब्रेक लागला आहे. या आयपीओचे नाव रोसमेरटा डिजिटल सर्व्हिसेस असे असून सेबीनेच या आयपीओला तात्पुरते थांबवले आहे. याआधीच्या तारखांनुसार 18 नोव्हेंबर रोजी येणार होता. मात्र आता कंपनीविरोधात सेबीकडे अनेक तक्रारी गेल्यामुले हा आयपीओ थांबवण्यात आला आहे. दरम्यान, सध्या भांडवली बाजाराची खराब स्थिती लक्षात घेऊन आम्ही हा आयपीओ सध्याच न आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण रोसमेरटा डिजिटल या कंपनीने दिले आहे.
रोसमेरटा डिजिटल ही कंपी आयपीओच्या माध्यमातून एकूण 206 कोटी रुपये उभे करणार होती. हा आयपीओ येत्या 18 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार होता. 21 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना या आयपीओत गुंतवणूक करता येणार होती. कंपनीने आयपीओचा किंमत पट्टा 140-147 रुपये प्रति शेअर असा ठेवला होता. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 140.36 लाख नवे शेअर्स जारी करणार होती. या आयपीओत OFS शेअर्स नसतील. ही कंपनी बीएसई एसएमई वर लिस्ट होणार आहे. रोसमेरटा डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड (Rosmerta डिजिटल सेवा) ही कंपनी रोसमेरटा टेक्नोलॉजीज लिमिटेड (आरटीएल) या कंपनीची उपकंपनी आहे.
रोसमेरटा डिजिटलच्या रेड हेरिंग प्रॉसपेक्ट्सनुसार (RHP) या कंपनीचा महसूल 183 टक्क्यांनी वाढला आहे. तर वित्त वर्ष 2023-24 चा निव्वळ नफा 553 टक्क्यांनी वाढलेला आहे. आयपीओच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम ही कंपनी मुंबईत ऑफिस खरेदी करण्यासाठी वापरणार आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत गोदाम. अनुभव केंद्र स्थापन करण्यासाठी हा पैसा वापरला जाणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
‘या’ पाच स्टॉक्सचा शेअर बाजारात धमाका! भविष्यात देणार 35 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स!
Share Market Holiday : मोठी बातमी! सलग 3 दिवस शेअर बाजार राहणार बंद, लाँग विकएंडचं नेमकं कारण काय?
अधिक पाहा..