Rohit Sharma Become Father: रोहित शर्मा दुसऱ्यांदा बनला बाबा, पत्नी रितिकाने दिला मुलाला जन्म
Times Now Marathi November 16, 2024 12:45 PM

: टीम इंडिया सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र, संघाचा कर्णधार रोहित शर्मा अजूनही भारतातच आहे. याचे कारण म्हणजे रोहित शर्माच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने मुलाला जन्म दिला आहे. यामुळे रोहित अद्याप ऑस्ट्रेलियाला गेला नाही. रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचे हे दुसरे अपत्य आहे. याआधी दोघांना एक मुलगीही होती. ज्याचे नाव समायरा. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे.

रोहितवर अभिनंदनाचा वर्षाव

रोहित शर्माची पत्नी रितिका हिने 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. रोहित-रितिका दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. याआधी 2018 मध्ये मुलगी समायरा हिचा जन्म झाला होता. मुलाच्या जन्मानंतर रोहितवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच कारणामुळे रोहित शर्माने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी बीसीसीआयकडे पितृत्व रजा मागितली होती. रितिकाच्या प्रेग्नंसीची बातमी या जोडप्याने बराच काळ लपवून ठेवली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर होण्यापूर्वी रोहितने रजेची मागणी केल्यानंतर ही बाब समोर आली होती.

रोहित लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार?

त्याच्या दुसऱ्या अपत्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या सुमारे 6 दिवस आधी त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. अशा परिस्थितीत रोहित शर्माकडे आता या सामन्यासाठी संघात सामील होण्यासाठी पूर्ण वेळ आहे. रोहित लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो.

रोहित शर्माची भारताला गरज

ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव आहे. रोहित शर्मा हा सलामीवीर आहे. त्यामुळे टीम इंडियाला त्याची गरज आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टिकोनातून टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा जितक्या लवकर संघात सामील होईल तितक्या लवकर भारतीय चाहत्यांसाठी आणि संघासाठी चांगलं असेल.

ऑस्ट्रेलियातील कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर तीन अर्धशतके आहेत. तो अजूनही पहिल्या शतकाचा शोधात घेत आहे. रोहित शर्मा लवकरच संघात सामील झाल्यामुळे टीम इंडियाच्या बॅटिंग लाइनअपला फायदा होईल. याशिवाय ऑस्ट्रेलियातील सराव सत्रादरम्यान टीम इंडियाचे काही खेळाडू जखमी झाले. रोहित शर्माच्या आगमनाने त्या खेळाडूंवर खेळण्याचे फारसे दडपण राहणार नाही. त्यामुळे तो लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.