...तर संजय राऊत आणि कसाब यांच्यात फरक तो काय? व्होट जिहादच्या मुद्द्यावरून नितेश राणेंची बोचरी टीका
सदाशिव लाड, एबीपी माझा November 16, 2024 02:43 PM

Maharashtra Assembly Election 2024 सिंधुदुर्ग : वोट जिहादच (Vote Jihad) उत्तम उदाहरणं म्हणजे तालीबान समर्थक नेमानी जो तालीबानला जाहीर समर्थन करतो. आपल्या देशात राहून मुस्लिम लॉ बोर्डची काय गरज? वक्फ बोर्ड फक्त आमच्या देशात आहे, इतर इस्लामिक देशात नाही. देशात यांचे वेगळे लाड का करायचे. असा सवाल करत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सडकून टीका केली आहे. 

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी घातली पाहिजे. हा नेमानी मौलवी तालीबान समर्थक आहे. कसाबला जस संपवलं, तो नियम ह्या नेमणीला लावला पाहिजे, हा आतंकवादी आहे. या गोष्टी आमच्या राज्यात खपवून घेतल्या जाणार नाही. या बोर्डवर बंदी टाका, ही अतिरेकी संघटना आहे. मात्र या संघटनेला समर्थन करणाऱ्या संजय राऊत हिंदू असून पण त्यांचे समर्थन करतात, हे तुमचे तरी होतील का? असा सवाल करत नितेश राणेंनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. एक है तो सेफ है, हा विचार जर आपण घेतला नाही, तर देवी देवतांची पूजा करू नका, असे फतवे काढतील. तेव्हा आमचा हिंदू समाज कुठे जाईल? हाच विचार देवेंद्र फडणवीस देत असतील आणि त्याला विरोध जर संजय राऊत करत असतील तर त्यांच्यात आणि कसाबमध्ये फरक नाही. असेही नितेश राणे म्हणाले.

सर्वात मोठा लुटारू मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलाय

आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकवून दाखवला आहे. पाकिस्तानमध्ये पण झेंडा फडकवून दाखवू. राज्यात सर्वात मोठा लुटारू मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलाय आहे, आजकाल त्याच्या बॅगा तपसल्या जातं आहेत. उद्धव ठाकरे मुंबईचा सात बारावर श्रीधर पाटणकर नाव चढविणार होते ते आम्ही थांबवलं. तुमच्या पाटणकरला पहिले आवरा, मग अदानी सारख्या देशभक्ता वर बोला. असे म्हणत नितेश राणेंची  उद्धव ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली आहे. 

हिंदूच्या बाजूने कोणी बोललं कि जनाब उद्धव ठाकरेंना वाईट वाटतं

ज्या बाईने आमच्या देवी देवातांना सोडल नाही, ती आम्हाला शिव्या शाप देणारच. तिच्या बाबत कमी बोललं तर चालेल. अन्यथा अंगावर गोमूत्र शिंपडावं लागेल. असे म्हणत नितेश राणेंनी सुषमा अंधारे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांना हिंदूंचा द्वेष झालाय, ते हिंदू बाबत बोलले तर जामा मशीदमध्ये बसलेला नवीन अब्बा त्याना वाईट वाटेल. हिंदूच्या बाजूने कोणी बोललं कि जनाब उद्धव ठाकरे यांना वाईट वाटतं. असेही नितेश राणे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या  

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.