Winter travel tips – थंडीत प्रवास करताना घ्या ही काळजी
Marathi November 16, 2024 03:25 PM

हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरणामुळे ट्रिपचे प्लॅन हमखास बनवले जातात. हिवाळ्यात प्रवास करण्याची एक वेगळीच मज्जा असते. हिवाळ्यातील गुलाबी थंडी आणि सोबत जिवा-भावाची माणसे असतील तर ट्रिप म्हणजे सोन्याहून पिवळी असते. पण, गुलाबी थंडीत फिरायला जेवढी मज्जा येते, तेवढीच आजारी पडण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्ही थंडीत प्रवास करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. यात हवामानानुसार कपडे, औषधे, आवश्यक वस्तू या तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असायला हव्यात, जेणेकरून वेळेला तुमची गैरसोय होणार नाही.

उबदार कपडे –

कपड्यांची पॅकिंग करताना मफलर, जॅकेट्स असे थंडीपासून संरक्षण करणारे कपडे घ्यावेत. जर लहान मुलेही सोबत असतील तर त्यांच्यासाठी अधिक उबदार कपडे घ्या. बदलत्या वातावरणात लहान मुले पटकन आजारी पडतात. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या.

– जाहिरात –

वजनदार बॅग्स टाळा –

थंडीत ट्रिपला जायचे म्हणजे बरेचजण जाड आणि वजनदार कपडे जास्त घेतात, ज्यामुळे बॅग जड होते. काहींचा असा समज असतो की, वजनदार आणि जाड कपडे म्हणजेच शरीराचे थंडीपासून रक्षण होते. पण, तुम्ही जर उत्तम दर्जाचे उबदार कपडे घ्यायला हवेत, कारण असे कपडे पातळ असतात. अशा कपड्यांमुळे बॅग्ज जड होतात.

हॉटेल बूकिंग –

थंडीत आयत्या वेळी हॉटेल शोधणे ही मोठी समस्या असू शकते. त्यामुळे केवळ हिवाळ्यातच नाही तर कोणत्याही ट्रिपचे आयोजन करताना आधीच हॉटेल बूकींग करणे आवश्यक आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत ट्रिपला जात असाल तर ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. असे केल्याने ऐनवेळी तुमची गैरसोय होणार नाही.

– जाहिरात –

कॅश बाळगा –

हल्ली ऑनलाइन पेंमेंटला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येते. पण, फिरायला जाताना आपण जाऊ त्याठिकाणी ही सुविधा असेल याची खात्री नसते, त्यामुळे सोबत कॅश जरूर बाळगा. कधी कधी आपण फिरण्यासाठी छोट्या छोट्या गावांची, डोंगराळ भागाची निवड करतो. अशा सुविधा तेथे उपलब्ध नसतात. त्यामुळे कॅश नक्की सोबत ठेवा.

वैद्यकीय किट –

प्रवासादरम्यान मेडिकल किट सोबत ठेवा. प्रवास करताना कधी कोणत्या गोष्टीची गरज लागेल सांगता येत नाही. अशावेळी खोकल्याचे औषध, अॅटी-बायोटिक्स, बॅन्डेज सोबत ठेवा. महिलांनी सॅनिटरी नॅपकिनपण सोबत ठेवायला हवे.

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.