Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
कलर्स मराठीवर (Colors Marathi) सध्या अनेक नव्या मालिकांचा प्रवास सुरु होतोय. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं चित्र आहे. नुकतीच काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली 'अबीर गुलाल' (Abeer Gulal) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता कलर्सवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कलर्स मराठीवर 'पिंगा ग पोरी पिंगा' ही मालिका येत्या 25 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित केली जाईल. त्यामुळे 'दुर्गा' (Durga) मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
बाबा सिद्दीकींवर (Baba Siddique) गोळीबार केल्यावर शूटर शिवकुमार गौतम (Shiv Kumar Gautam) तब्बल अर्धातास हॉस्पिटलबाहेर उपस्थित होता. बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे की, नाही याची खातरजमा करण्यासाठी तो रूग्णालयाबाहेर थांबला होता, अशी माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या क्राईम ब्रांच करत आहे. क्राईम ब्रँचच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. अशातच आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगनं सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याच्या 10 दिवसांनंतर बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट रचला होता, असा खुलासा क्राईम ब्रांचच्या तपासात झाला आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
अनुपमा (Anupamaa) ही स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका कायमच टीआरपीच्या शर्यतीत टॉपवर असते. त्यामुळे ही मालिका कायमच चर्चेत असते. पण नुकतच या मालिकेच्या सेटवर एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सेटवरील एका असिस्टंट लाईट मॅनचा मृत्यू झाल्याची धक्कदायक बातमी समोर येत आहे. एबीपी न्यूजच्या विशेष माहितीनुसार, गुरुवारी, 14 नोव्हेंबर रोजी 'अनुपमा'च्या सेटवर एक अपघात झाला. सेटवरच्या असिस्टंट लाइटमनला विजेचा धक्का लागला. त्यानंतर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
लेखक दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) याने आतापर्यंत अनेक चिरकाल लक्षात राहणारे सिनेमे आणि नाटक मराठी प्रेक्षकांसाठी तयार केली आहेत. त्याच्या लेखणीवर, दिग्दर्शनावर प्रेक्षक अगदी मनापासून दादही देतात. नुकतच क्षितीज आता बॉलिवूडमध्ये त्याच्या शब्दांच्या जादूने साऱ्यांची मनं जिंकत आहे. 'सिंघम अगेन'चं (Singham Again) लिखाणही त्यानेच केलं आहे. पण मराठी सिनेमातील लेखकांविषयी क्षितीजने केलेल्या व्यक्तव्याने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
राज्यात अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Assembly Elections) निकाल लागणार आहे. यंदाची निवडणुकांची ही परीक्षा प्रत्येक राजकीय पक्षासाठी आणि नेत्यांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राजकीय रणधुमाळीत यंदा होणाऱ्या नात्यांच्या लढतीमध्ये अवघा महाराष्ट्र कुणाच्या बाजूने कौल देणार हे येत्या 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईलच. पण त्याआधी प्रचाराच्या तोफा शांत होण्याआधी मतदारांपर्यंत पोहण्याचा प्रत्येकाचा कसोशीचा मानस आहे. यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रचाराची दिशा ठरवली जातेय. यामध्ये सेलिब्रेटींच्या प्रचारांने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. नुकतच अभिनेता प्रसाद ओकनेही (Prasad Oak) महायुतीच्या सरकारसाठी खास व्हिडीओ केला आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
महाराष्ट्राची पहिली पसंती असलेल्या स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीने प्रेक्षकांच्या अभिरुचीचा नेहमीच विचार करत नवनव्या कलाकृती सादर केल्या आहेत. त्यामुळेच स्टार प्रवाहच्या मालिका आणि त्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. स्टार प्रवाह परिवारात लवकरच दाखल होतेय नवी मल्टीस्टारर मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम!' (Lagnanantar Hoilach Prem) मालिकेच्या शीर्षकावरुनच मालिकेची गोष्ट काय असेल याचा अंदाज येतो.