Pankaja Munde : सख्खा भाऊ बहिणीला किती ओवाळणी देतो, 500 आणि 1000. मग मुख्यमंत्र्यांनी तर तिप्पट ओवाळणी दिली असल्याचे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी 1500 रुपये दिले आहेत. तुमचे देखील वीज बिल माफ केले आहे. तुमच्या लाईट बिलावर भोपळा येतो, तोच भोपळा विरोधकांना द्या असा टोला देखील राजळे यांनी लगावला. मला ऊसतोड कामगारांचे महामंडळ द्या ऊसतोड मजुरांची मी गरिबी मिटवेल असेही त्या म्हणाल्या. पाथर्डी विधानसभेच्या उमेदवार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत त्या बोलत होत्या.
20 तारखेला मतदान आहे या दिवशी कमळाच्या फुलासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवार म्हणून मोनिका राजळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं. मोनिका राजळीनी त्यांच्या भाषणात केलेला विकास सांगितला, शेवगाव पाथर्डी साठी मुंडे साहेबांच्या काय भावना होत्या आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही असेही त्या म्हणाल्या. ही माझ्या भगवानबाबांची भगवान गडाची भूमी आहे. या पाथर्डीचे मोठे भाग्य आहे. एका बाजूने वामन भाऊ तर एका बाजूने भगवान बाबा, तर एका बाजूने पुण्यश्लोक अहिल्यादेवी या आशीर्वाद देत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
ज्यांचं कोणी वाली नाही त्यांच्यासाठी मुंडे साहेब राजकारणात आले असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.कोणत्याही भूलथापांना बळी न पडता लोकांचं काम करायचं हे माझ्या वडिलांनी सांगितलं आहे. परळीपेक्षा पाथर्डीने माझं जास्त ऐकलं, माझ्या शब्दावर तुम्ही मोनिका राजळे यांना निवडून दिल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी सभांची यादी केली तेव्हा मोनिका राजळेंना म्हटलं मला हेलिकॉप्टर नाही, तेव्हा काय करावं. मग मी सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टरमध्ये जीव मुठीत धरुन आल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
आज एवढंसं हेलिकॉप्टर घेऊन मी आले डबल इंजिनचे हेलिकॉप्टर राजनाथ सिंग यांच्या सभेला गेले म्हणाले. मी म्हणाले स्कुटरला इंजिन बांधून द्या पण मला सभेला जाऊद्या असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. आज मोदींची हॅट्रिक झाली, मोनिकाताईंची देखील करुन टाका असं पंकजा मुंडे म्हणाल्या. अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता आहे छोटे मनसे कोई बडा नही होता टूटे मनसे कोई खडा नही होता. कोणी आपल्याला धिक्कारलं, कोणी अडचणीत आणलं, द्वेष केला तरीसुद्धा त्याच्याविषयी आपलं मन छोटं ठेवायचं नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या. प्रत्येक निवडणुकीत एक अजेंडा असतो त्याचं रूप बदलून स्पिरीट तयार होतं. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीने काही दिलं नाही मात्र आता स्पिरिट आहे .आता विजयाचे स्पिरिट घेऊन आपल्याला जायचं आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंडे साहेबांपेक्षा मी जास्त शेवगाव पाथर्डी मतदारसंघावर प्रेम केलं, मी मंत्री असताना एक रुपया देखील कमी दिला नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
माझ्यासोबत नेहमी असणाऱ्या लोकांवर माझ्या लोकसभेतील पराभवाचा परिणाम होऊ देणार नसल्याचा विश्वास भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय. परभणीच्या जिंतूर येथे भाजप उमेदवार तथा आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. जिंतूर येथे आज पंकजा मुंडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी मेघना बोर्डीकर यांना निवडून देण्याचा आवाहन केलं. महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडेंना आमदार खासदार तयार करणारी फॅक्टरी म्हणलं जात त्याच पद्धतीने इतिहासात माझही नाव राहावं असं काम मी करणार असल्याचं त्या म्हणाल्या.