Amalner Vidhan Sabha Constituency: अमळनेरमध्ये महायुतीचे अनिल पाटील गड राखणार की भाजप ठरणार सरस ? कोण उधळणार विजयाचा गुलाल?
ज्योती देवरे November 16, 2024 03:43 PM

Amalner Vidhan Sabha Constituency : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धूम सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर अमळनेर विधानसभा मतदारसंघाची (Amalner Vidhan Sabha Constituency) राज्यात सर्वाधिक चर्चा आहे.  महाराष्ट्रातील अमळनेर विधानसभा जागा राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 15 व्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघातून अनिल पाटील, डॉ अनिल शिंदे की शिरीष चौधरी? कोण उधळणार विजयाचा गुलाल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महाविकास आघाडी गड राखणार का?

या मतदारसंघात (Mahayuti) महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांना संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेसने अनिल शिंदे (Anil Shinde) यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर भाजपचे बंडखोर नेते अपक्ष शिरीष चौधरी रिंगणात असतील. राज्यातील इतर जागांच्या तुलनेत या जागेवरील जनतेने सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि जनता पक्षाला वारंवार संधी दिली आहे. त्यानंतर 1995 ते 2004 पर्यंत येथे भाजपची सत्ता होती. यानंतर अपक्ष उमेदवारांनीही या जागेवर दोनदा विजय मिळवला आहे. सध्या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील यांच्याकडे आहे.

2019 निवडणुकीत काय झाले?

संपूर्ण खान्देशमध्ये अमळनेर विधानसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. कारण 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत अनिल पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात होते. त्यांच्यासमोर शिरीष चौधरी हे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. यावेळी शिरीष चौधरी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. या विधानसभा निवडणुकीत लोकांनी राष्ट्रवादीला साथ दिली. राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांना एकूण 93,757 मते मिळाली तर भाजपच्या तिकीटावर लढलेल्या शिरीष दादांना एकूण 85,163 मते मिळाली. भाजपचे शिरीष दादा एकूण 8,594 मतांनी पराभूत झाले आणि विजय राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांना मिळाला.

महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा कोणाच्या हाती जाणार?

महाराष्ट्रात (Maharashtra District Vidhan Sabha Election 2024) यंदा एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला सर्व विधानसभांमध्ये मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकूण 11 मतदार संघ असून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि चर्चेचे मतदारसंघ आहेत. मतमोजणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा महायुतीच्या हातात जाणार की महाविकास आघाडीच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे. 

Jalgaon District Vidhan Sabha Election: जळगावातील 11 विधानसभा मतदारसंघांत कोण-कोणाला आव्हान देणार? कोणत्या पक्षाचं पारडं जड ठरणार?

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.