Sanjay Raut On DCM Devendra Fadanvis KP
Marathi November 17, 2024 07:24 AM


फडणवीस बांगलादेशात निवडणूक लढवत नाही, तर महाराष्ट्रात निवडणूक लढवत आहेत. तसेच मतदारांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला किंवा पक्षाला ते मतदान करतील. मात्र भाजपाच्या काही नेत्यांकडून मतदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

मुंबई : फडणवीस बांगलादेशात निवडणूक लढवत नाही, तर महाराष्ट्रात निवडणूक लढवत आहेत. तसेच मतदारांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला किंवा पक्षाला ते मतदान करतील. मात्र भाजपाच्या काही नेत्यांकडून मतदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. तसेच फडणवीस बांगलादेशात किंवा पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवत नाही, तर हा महाराष्ट्र आहे. तसेच कसला सारख व्होट जिहाद करत असता, असे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. (Sanjay Raut On DCM Devendra Fadanvis.)

हेही वाचा : Ravindra Waikar : रवींद्र वायकरांना आता शांत झोप लागणार, जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर न्यायालयाकडून बंद

– Advertisement –

भाजपच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध आहे. पण महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचे धर्मयुद्ध सुरु आहे, असे राऊत म्हणाले आहेत. तसेच महाराष्ट्र जागाच आहे. महाराष्ट्र कधीच झोपलेला नाही. म्हणूनच लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने तुम्हाला झोपवले. जोपर्यंत महाराष्ट्र जागा आहे, तोपर्यंत या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा यांच्या सारख्या लुटारू लोकांना हा देश इंग्रजांप्रमाणे लुटता येणार नाही. आम्ही महाराष्ट्रात जागे आहोत. आम्ही जागे नसतो तर, महाराष्ट्राचा अर्धा सातबारा देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने गौतम अदानींच्या नावावर केला असता, अशा शब्दात राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा : Favorite CM : अजित पवार यांनी सांगितले सर्वात चांगले मुख्यमंत्री, त्यांनीच शिकवले आघाडीचे राजकारण…

– Advertisement –

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. यही समय है, सही समय है। सोए हुओं को जगाने का…, अशा आशयाचे हे ट्विट आहे. काहीच वेळात फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत फडणवीस काय बोलणार? याकडे लक्ष लागलेले आहे. असं असतानाच फडणवीसांच्या ट्विटवर संजय राऊतांनी चांगलाच निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध आहे. पण महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आमचं धर्मयुद्ध सुरु आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.


Edited By Komal Pawar Govalkar



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.