163 मतदारसंघांत पिपाणी चिन्हांचे वाटप, निवडणुकीत भाजपकडून रडीचा डाव; सुप्रिया सुळे यांची सडकून टीका
Marathi November 17, 2024 08:24 AM


राज्याच्या विधानसभेत भाजपने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुतारी चिन्हासारखे दिसणाऱया पिपाणी चिन्हावर भाजपने 163 अपक्ष उमेदवार उभे केले आहेत, असा घणाघाती हल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने चिन्हांच्या नावात बदल न केल्याने साताऱयामध्ये महायुतीचा उमेदवार विजयी झाला, हे स्वतः अजित पवार यांनी कबूल केले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.



राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार यांचा पक्ष नाही, घडय़ाळ चिन्हदेखील त्यांचे नाही. जर पक्षाच्या चिह्याखाली ‘न्यायप्रविष्ट’ असे लिहिले नसेल तर तुम्ही मला त्याचे पह्टो पाठवा, मी त्यांना कोर्टाकडून नोटीस पाठवते, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाइन होत नाही, हे देवाभाऊंना चांगलेच माहिती आहे. त्यांचा हा अधिकार मी हिरावून घेणार नाही. ‘इतना तो चलता है’, पण शरद पवार यांच्यावर टीका केल्याने महागाईचा प्रश्न सुटणार नाही. भाजपकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे ते शरद पवार यांच्यावर टीका करतात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही तर पक्षाच्या विरोधात आमची लढाई सुरू आहे. कोर्टात केस सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार यांचा पक्ष नाही, चिन्हदेखील त्यांचे नाही, असे कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे, असेही सुळे म्हणाल्या.

साताऱयात पिपाणीमुळे भाजपचा विजय

सातारा लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा भाजपचे उमेदवार भोसले यांनी 32 हजार 771 मतांनी पराभव केला, तर पिपाणी या चिन्हावर लढलेले अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना 37 हजार 62 मते मिळाली आहेत. त्यामुळे यावरून स्पष्ट होते की, पिपाणी चिन्ह नसते तर सातारा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला असता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.