अभिनेता गोविंदाच्या छातीत दुखू लागले, रुग्णालयात केले दाखल
Marathi November 17, 2024 07:24 PM


बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पुन्हा एकदा तब्येत बिघडली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्याच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.



गोविंदा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी जळगावमध्ये होता. त्यावेळी अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी संपूर्ण माहिती मिळालेली नाही. गोविंदाच्या चाहत्यांमध्ये त्याच्या तब्येतीबाबत चितेंचे वातावरण पसरले आहे. याआधी त्याला गोळी लागली होती. गोविंदाचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी  प्रार्थना करत आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.