Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये (Karjat Jamkhed Assembly Constituency) शरद पवारांचे नातू रोहित पवारांविरोधात भाजपचे राम शिंदे रिंगणात आहे. दरम्यान, राम शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी नितीन गडकरी यांनी सभेत बोलताना रोहित पवारांना (Rohit Pawar) जोरदार टोला लगावला. लग्न आमचं झालं, मुलं आम्हाला झाली आणि लाडू भलतेच वाटू राहिले. म्हणजे मी मंत्री, रस्ते मी केले, आमच्या पक्षाच्या राम शिंदे, आम्ही काम केलं आणि गावात भलतेचं लोक लाडू वाटू राहिले. अस म्हणत गडकरी यांनी रोहित पवारांना टोला लागवला आहे. नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय रोहित पवार घेत असल्याने गडकरी यांनी रोहित पवारांवर निशाणा साधत हा अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
ज्यावेळी विकासाच्या कामावर मत मागता येत नाहीत, तेव्हा जनतेच्या मनात विष घालवण्याचा प्रयत्न होतो. मागच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला गेला की, भारतीय जनता पार्टीला 400 जागा मिळाल्या तर बाबासाहेबांचे संविधान बदलणार. मात्र आम्ही बाबासाहेबांचे संविधान बदलणार नाही, कुणाला बदलू ही देणार नाही आणि कुणाचे बदलवण्याची हिंमत देखील नाही, असं म्हणत भाजप नेते नितीन गडकरी यांनी विरोधकांवरती तोफ डागली.कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मिरजगाव येथे आयोजित प्रचार सभेत नितीन गडकरी बोलत होते.
सुप्रीम कोर्टात एक मोठी केस चालली होती केशवानंद भारती यांचे या केस मध्ये सुप्रीम कोर्टाच्या 11 जणांच्या खंडपीठाने स्पष्टपणे म्हटल आहे की संविधानातील मूलभूततत्व बदलता येणार नाही. मात्र दुसरीकडे घटना तोडण्याचं पाप काँग्रेसने केलं ज्यावेळी रायबरेली मतदारसंघातून इंदिरा गांधी यांचा विजय झाला होता त्यावेळी त्यांच्या विरोधात अलाहाबाद कोर्टात केस चालली आणि ती निवडणूक अवैध ठरवण्यात आली. त्यावेळी आणीबाणी लावण्यात आली आणि त्याच काळात काँग्रेसने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जीया उडवल्या, ज्या पक्षांना संविधानाच्या धज्जीया उडवल्या तोच पक्ष आता खोटा प्रचार करत आहे, यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. असं म्हणत नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
इतर महत्वाच्या बातम्या