Gold Price: शेअर बाजारासोबत सोन्याचे दर गडगडले; लग्नसराईत सोन्याच्या भावात का होतेय घसरण, पुढे काय होणार?
Times Now Marathi November 17, 2024 10:45 PM

Share Market and Gold Rate falling: लग्नसराईत सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण असे असतानाही आता सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. शेअर बाजारात पडझड आणि पहायला मिळत आहे. गेल्या चार सत्रांपासून सोन्याच्या दरात घट होत आहे. यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. जाणून घेऊयात यामागचे नेमके कारण काय आहे.

गुंतवणुकदार चिंतेत
शेअर बाजारात होत असलेल्या पडझडीमुळे गुंतवणुकदार सुद्दा चिंतेत आहेत. काही काळापूर्वी मानले जात होते की, शेअर बाजारात घसरण सुरू जाल्यावर सोन्याच्या दरात उसळी येते. गुंतवणुकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यात गुंतवणूक करतात. पण आता शेअर बाजारासोबतच सोन्याच्या दरातही घसरण होत आहे.

हे पण वाचा :

अमेरिकन डॉलर
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकन चलन असलेले डॉलर मजबूत स्थितीत पोहोचले आहे. डॉलर निर्देशांकाने वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. ज्यावेळी डॉलर मजबूत होतो तेव्हा सोने आणि चांदीसारखे मौल्यवान धातू यांची मागणी कमी होते आणि किमती घसरतात.

व्याजदरात कपातीची अपेक्षा
फेडरल रिझर्व्हने या महिन्यात दुसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. ही कपात आणखीही सुरू राहू शकते. व्याजदरात कपात होण्याच्या अपेक्षेने सोन्याच्या किमतीवर दबाव येत आहे. अशा परिस्थितती सोन्यात गुंतवणूक वाढली तरी किंमत कमी होते.

जागतिक बाजारपेठेचा प्रभाव
जागतिक स्तरावर होत असलेल्या व्यवसायाचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होतो. सध्या जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. कॉमेक्स फ्युचर्स ट्रेडमध्ये सोने 1.13 टक्क्यांनी घसरून 2,557.40 डॉलर्स प्रति औंस इतका झाला आहे. हा दोन महिन्यांतील नीचांक आहे.

गुंतवणुकदारांनी काय करावे?
शेअर बाजारातील पडझड आणि सोने-चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण यामुळे आता काय करावे असा प्रश्न गुंतवणुकदारांना पडला आहे. या परिस्थितीत गुंतवणुकदारांनी सावध राङण्याची आवश्यकता आहे. बाजारातील ट्रेंड समजून घेणे गरजेचे आहे. तसेच सर्व परिस्थिती पाहून गुंतवणूक करावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

(Disclaimer : हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. कोणत्याही योजनेत, शेअर मार्केट, सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला आम्ही देत नाही. या संदर्भात गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.