Health benefits from Fennel seeds carom seeds water : जेवणानंतर अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुमच्या अन्नपदार्थाला विशिष्ट चवीची जोड देणाऱ्या या ओवा व बडीशेप आणि जिरा याचं एकत्र मिक्स पाणी आरोग्याला अनेक फायदे आहेत. ओवा व बडीशेप यांचे पाणी जेवल्यानंतर प्यायल्याने त्याचे आरोग्याला विविध फायदे होतात.
- ओवा व बडीशेप, जिरा यांचे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. हे पेय तुमचे चयापचय जलद करून, कॅलरी बर्न करण्यासदेखील मदत करू शकते.
- ओवा आणि बडीशेप मिळून बनविलेले कोमट पाणी प्यायल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते. कारण- त्यात दाहकविरोधी गुणधर्म असतात.
- मासिक पाळीच्या क्रॅम्पमुळे महिलांना त्रास होत असल्यास बडीशेप, जिरा आणि ओव्याचे पाणी प्यायल्यास आराम मिळू शकतो.
- बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते.
- ओवा, जिरा आणि बडीशेपचे पाणी पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्यास मदत करते.
- बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज असतात. शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. यात असलेले पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात.
हे ही लक्षात ठेवा
- काही व्यक्तींना बडीशेप किंवा ओव्याची ॲलर्जी असू शकते. लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल अस्वस्थता यांचा समावेश असू शकतो. तुम्हाला कोणतीही प्रतिकूल प्रतिक्रिया जाणवल्यास त्याचा वापर बंद करा आणि आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्या.
- पोटाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी ओवा-बडीशेपचे पाणी प्यायल्याने अस्वस्थता किंवा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कमी प्रमाणात सेवन करून पाहावे आणि प्रतिक्रिया तपासावी.
जिरे, बडीशेप, आणि ओव्याचे पाणी कसे बनवायचे?
एक चमचा बडीशेप, एक चमचा जिरे, एक चमचा ओवा आणि मध लागणार आहे. यासाठी दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. यानंतर या पाण्यात बडीशेप, जिरे आणि ओवा मिक्स करा. दहा मिनिटे हे पाणी तसेच उसळूद्या. त्यानंतर शेवटी या पाण्यात मध घाला. हे पाणी कोमट झाल्यावर प्या.
– जाहिरात –