गोंदिया गुन्हे: कर्तव्य बजावितांना तणावात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:च्या एसएलआर रायफने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.17) सायंकाळी गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावर घडली. राकेश पांडुरंग भांडारकर (वय 37, रा. पदमपूर ता.आमगाव जि. गोंदिया) असे गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या पोलिस शिपायाचे नाव आहे.
अधिकची माहिती अशी की, गोंदिया पोलीस दलात कार्यरत पोलिस शिपाई राकेश पांडुरंग भांडारकर (वय 37) यांची ड्युटी गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळ येथे आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून बिरसी विमानतळ येथेच कर्तव्यावर आहे. राकेशची ड्युटी बिरसी विमानतळावर सुरळीतपणे सुरू होती. रविवारी पाईंटवर ड्युटी करतांना त्याला त्याचे तेथील अधिकारी व काही सहकारी त्याला मानसिक त्रास देत होते. पाईंटवर ड्युटी असतांना त्याला इकडे-तिकडे पाठवित होते. त्याला वारंवार मानसिक त्रास देत असल्याने तणावात आलेल्या राकेशने स्वत: जवळील असलेल्या एसएलआर रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे बोलल्या जाते.
राकेश भांडारकर यांची बहिणी अरूणा भांडारकर ही देखील गोंदिया पोलिस दलात पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. राकेशने दुपारी 2 वाजून 48 निटांनी आपल्या बहिणीच्या मोबाईलवर एक मॅसेज पाठविला. राखीव लोक असताना मला पाईंटवरून बोलावत आहेत. माझ्या मरणाला कारणीभूत हे तीन लोक आहेत,असा मॅसेज टाकून त्या मॅसेजमध्ये एका पीएसआयसह तिघांचे नाव टाकले आहे.
आपल्या कामात व्यस्त असलेल्या अरूणा भांडारकर यांनी मोबाईलला हात न लावल्यामुळे तिने भावाचा मॅसेज पाहिला नव्हता. सायंकाळ होताच त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानंतरच राकेशच्या मृत्यूची बातमी कळाली. त्यानंतर तिने मोबाइलवर आलेला मॅसेज पाहिला व लगेच तिने बिरसी विमानतळाच्या दिशेने धाव घेतली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..