मतदान जनजागृतीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची बाईक रॅली
उरण, ता. १७ (वार्ताहर) ः उरण मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. विविध थीममधून मतदान जनजागृती केली जात आहे. त्या अनुषंगाने नुकतेच निवडणूक अधिकऱ्यांनी मतदान जनजागृतीसाठी उरण परिसरातील बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ही बाईक रॅली संपूर्ण उरणच्या ग्रामीण भागात काढण्यात आली होती. यावेळी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, मतदान का केले पाहिजे हेही पटवून सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार,
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उरण तहसीलदार उद्धव कदम, स्वीप नोडल अधिकारी प्रियांका पाटील, स्वीप अधिकारी नरेश मोकाशी, बबन पाटील, रुपेश पाटील, अनिल म्हात्रे, निर्मला घरत, समता ठाकूर, संगीता गावंड, तसेच उरण तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.