पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड
Saam TV November 18, 2024 04:45 AM

पाटणा येथील गांधी मैदानावर 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात चाहत्यांनी मोठी गर्दी जमली होती. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागली होती. जमाव नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

जोश, उत्कटता आणि उत्साहाने भरलेल्या लोकांसाठी रविवारचा दिवस खूप खास होता. अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या पुष्पा-2 चित्रपटाचा ट्रेलर गांधी मैदानावर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेता अल्लू अर्जुन गांधी मैदानावर पोहोचला. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. चाहत्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले. काही लोक वॉच टॉवरवर चढले. तर काहींनी थेट बॅरिकेट्स तोडलं.

दरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवावा लागला. 'पुष्पा 2: द रुल'च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटची वेळ संध्याकाळी 6.30 वाजता ठेवण्यात आली होती. मात्र सायंकाळी पाच वाजताच कार्यक्रम सुरू झाला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना गांधी मैदानात पोहोचताच गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागली.

'पुष्पा 2: द रुल'च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमासाठी गांधी मैदानावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. पाटणाचे डीएम आणि एसएसपीही गांधी मैदानावर उपस्थित होते. पण कदाचित एवढ्या प्रमाणात गर्दी वाढेल याची कल्पना प्रशासनालाही नव्हती.

कार्यक्रमादरम्यान अल्लू अर्जुनने चाहत्यांशी संवाद साधला. मी बिहारच्या पवित्र भूमीला सलाम करतो. मी पहिल्यांदाच बिहारमध्ये आलोय. तुम्ही खूप प्रेम दिले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. चित्रपटात पुष्पा भाऊ कधीच झुकला नाही, पण तुम्हा सर्वांच्या प्रेमापुढे आम्हाला झुकावे लागले.

प्रेक्षकांचे अपार प्रेम आणि गर्दी पाहून त्यांनी 'पुष्पा कोई फूल समझे हैं क्या, अब मैं जंगली फोयर हूं' हा डॉयलॉग अल्लू अर्जुनने चाहत्यांना ऐकवला. अल्लू अर्जुन म्हणाले की, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही सर्वांनी आम्हाला माफ करावे. तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हा चित्रपट प्रचंड यशस्वी झालाय. तीन वर्षांची मेहनत आज तुमच्यासमोर आहे. या चित्रपटासाठी सर्व कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे. हा चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे पाटण्यातील लोकांचे प्रेम गरजेचं असल्याचं अल्लू अर्जुन म्हणाला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.