Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली
Saam TV November 18, 2024 06:45 AM

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील किल्ले तोरणाकडे जाणाऱ्या पर्यटकांची मिनी बस शंभर फुटाहून अधिक दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या बसमध्ये बदलापुरातील देखील प्रवासी होती.

तोरणा किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची शंभर फुटाहून अधिक दरीत कोसळली. मात्र, ही मिनी बस झाडाला अडकल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात निलेश प्रताप कदम (५०), संजय मधुकर पाटील (४९) दोघेही किरकोळ जखमी झाले. हे दोघेही बदलापुरातील राहणारे आहेत. बसमधील इतर पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिनी ट्रॅव्हलमधील त्यांची सहकारी सुरेंद्र मरळ यांनी दिली.

या प्रकरणी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या जखमी पर्यटकांवर वेल्हे ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार केले असल्याची माहिती येथील डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, या मिनी बसमध्ये पंचवीस पर्यटक हे किल्ले तोरणा गडावर बसने जात होते. यावेळी पार्किंगच्या अलीकडे असलेल्या मोठ्या वळणावरती बस चालकाचा ताबा सुटल्याने चढावरून मागे घेताना रस्त्याच्या कडेवरून खाली खोल दरीत 100 फुटावून अधिक कोसळली. मात्र, मिनी बस ही मागे जात असताना झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.