IND vs AUS; हर्षित राणा की प्रसिद्ध कृष्णा? पहिल्या सामन्यासाठी कोणाला मिळणार संधी?
Marathi November 18, 2024 02:25 AM

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ पर्थच्या मैदानावर सराव करत आहे. दोन्ही संघातील पहिला सामना (22 नोव्हेंबर) पर्थच्या मैदानावर खेळला जाणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधार होऊ शकतो. भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास हर्षित राणाला (Harshit Rana) पदार्पणाची संधी मिळू शकते. त्याच्यासोबत प्रसिद्ध कृष्णाही (Prasidh Krishna) प्रबळ दावेदार आहे.

हर्षित राणाची (Harshit Rana) उत्कृष्ट कामगिरी देशांतर्गत सामन्यांमध्ये दिसून आली आहे. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने 10 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 43 विकेट्स घेतल्या आहेत. हर्षितची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका डावात 45 धावांत 7 विकेट्स घेणे. त्याने लिस्ट ए मध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत. आता तो भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण करू शकतो. संघ व्यवस्थापन हर्षितवर विश्वास व्यक्त करू शकतात. त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.

भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराजचे (Mohammed Siraj) स्थान निश्चित आहे. यासोबतच हर्षित किंवा प्रसिद्ध कृष्णाची निवड करावी लागेल. प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर त्याने 21 प्रथम श्रेणी सामन्यात 75 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.

बॉर्डर गावस्कर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक-

पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी

महत्त्वाच्या बातम्या-

IPL Mega Auction; ‘हे’ 3 संघ मेगा लिलावात डेव्हिड मिलरला करणार टार्गेट?
जेसन गिलेस्पीची होणार सुट्टी? पाकिस्तानला मिळणार नवा मुख्य प्रशिक्षक
“मला ऑस्ट्रेलियात विराटचे कसोटी शतक पाहायचे आहे” ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.