मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून जोरदार घसरण सुरु आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांच्या समभागांची विक्री केल्यानं आणि भारतीय कंपन्यांची कामगिरी दुसऱ्या तिमाहीत समाधानकारक नसल्यानं बाजारात घसरण झाली आहे. गुंतवणूकदार यामुळं चिंतेत आहेत. या दरम्यान सी2सी अॅडवान्सड सिस्टम्स लिमिटेड या कंपनीचा एसएमई आयपीओ येणार आहे. या कंपनीच्या आयपीओची जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या या कंपनीच्या आयपीओचा प्रतिशेअर जीएमपी 220 रुपयांवर आहे.
सी2सी अॅडवान्सड सिस्टम्स लिमिटेडचा एसएमई आयपीओ 22 नोव्हेंबरपासून सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. तर, या आयपीओची लिस्टींग 29 नोव्हेंबरला होणार आहे. 99.07 कोटी रुपयांच्या आयपीओद्वारे 43.84 लाख नवे शेअर जारी केले जाणार आहेत.
या कंपनीच्या शेअरची आयपीओमध्ये 214-226 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये क्वालिफाइड इन्स्टीट्यूशनल बायर्स (QIB) यांच्यासाठी 50 टक्के कोटा निश्चित करण्यात आला आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा निश्चित करण्यात आला आहे. तर, 15 टक्के कोटा नॉन-इन्स्टीट्यूशनल गुंतवणूकदारांसठी निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओचा एक लॉट घेण्यासाठी किमान 1,35,600 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
सी2सी अॅडवान्सड सिस्टम्स लिमिटेडच्या आयपीओची ग्रे मार्केट प्रीमियमवर जोरदार चर्चा सुरु आहे. रविवारपर्यंत या कंपनीच्या आयपीओचा जीएमपी 220 रुपयांवर होता. म्हणजेच गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट परतावा हा जीएमपी कायम राहिल्यास त्यांना मिळू शकतो. जीएमपीमधील हाच ट्रेंड कायम राहिल्यास सी2सी अॅडवान्सड सिस्टम्स लिमिटेडच्या एका शेअरचं लिस्टींग 446 रुपयांना होईल. म्हणजेच एका शेअरमागं गुंतवणूकदारांना 226 रुपयांचा फायदा होऊ शकतो.
सी2सी अॅडवान्सड सिस्टम्स लिमिटेड कंपनी प्रोसेसर, पॉवर, रेडिओ फिक्वेन्सी, रडार, मायक्रोवेव, एम्बेडेड सॉफ्टवेअर आणि फर्मवेअरसह स्ट्रॅटेजिक डिफेन्स सोल्यूशनच्या पूर्ण स्पेक्ट्रम साठी डिझाईन पुरवते. C2C Advanced Systems Limited भारतीय शेयर बाजारात लिस्टेड असलेल्या पारस डिफेंस अँड स्पेस टेक्नोलॉजीज सोबत स्पर्धा करते. यामुळं या कंपनीच्या आयपीओला जोरदार प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..