बेरोजगारी, आरोग्य समस्या सोडवण्यासाठी मैदानात
esakal November 18, 2024 12:45 AM

-rat१६p७.jpg-
२४N२५५६४
पंकज तोडणकर
--------

बेरोजगारी, आरोग्य समस्या सोडवणार

पंकज तोडणकर ः घरोघरी प्रचार

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : तालुक्यात तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवणे, प्रत्येक गावात लघुउद्योजक तयार व्हावेत आणि पर्यटनआधारित उद्योग यावेत याकरिता मी निवडणूक प्रथमच लढवत आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार पंकज तोडणकर यांनी सांगितले.
अभियांत्रिकी पदवीधर आणि बीए झालेल्या पंकज तोडणकर हे गोळप, रनपार येथील रहिवासी आहेत. या निवडणुकीविषयी त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले की, मी दहा वर्षे गोळप विभागात राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. मी सर्वसामान्य घरातून आलो आहे. सध्या मी घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. अपक्ष उमेदवार म्हणून मला अनेकांनी सूचना केल्या आहेत. रत्नागिरीत अनेक समस्या आहे. आरोग्यविषयक. वैद्यकीय सुविधांच्या अभावी रुग्णांना मुंबई, कोल्हापूरमध्ये जावे लागते. त्या सेवा रुग्णांना रत्नागिरीत उपलब्ध व्हायला हव्यात. शासकीय हॉस्पिटलचे प्रश्न सोडवणे शक्य आहे. फक्त त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. एमआयडीसी व कामगारांचे प्रश्न सोवडणार आहे.
जाहीरनाम्याबाबत तोडणकर म्हणाले, सौरऊर्जेचा प्रसार झाला पाहिजे. रत्नागिरीतील गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तूंचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास होण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. रत्नागिरीत सौरऊर्जा, पनव ऊर्जा, फार्मास्युटिकल व सेवाक्षेत्रातील उद्योग आणून रत्नागिरीचा विकास करणार आहे. लाडके आजोबा-आजी, लाडके काका-काकी, लाडके मामा-मामी ही योजना राबवण्याचा मानस आहे. धूपप्रतिबंधक बंधारे, शेती, मत्स्योद्योगांना प्रशिक्षण, भूमीहिनांना रोजगार या गोष्टीसुद्धा करायच्या आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.